शिंदे+फडणवीसांचे ईडी सरकार अल्पकाळाचे=शिवसेना नेता चंद्रकांत खैरे

मंत्री पदासाठी ऊतावीळ झालेले आमदार, मंत्र्यांची कागदावरच कामे

बातमी शेअर करा...

 

 

औरंगाबाद दि. २२ ऑगस्ट – एकीकडे ईडीच्या नोटीसीची धास्ती दुसरीकडे कोर्टाचा निकालाचा धसका अशी अवस्था बंडखोरांची झाली आहे. त्यामुळे आई जेवू घालेना, बाप भीक मागू देईना अशी केविलवाणी स्थितीत आता सगळे रस्ते बंद झाले असतांना जनतेला काय तोंड द्यावे. यासाठी नाईलाजाने महाविकास आघाडी सरकारने केलेल्या मंजूर कामांचा गाजावाजा पूर्वी विरोधात असलेल्या भाजपला सोबत घेऊन करत आहे. त्यामुळे हे अनैसर्गिक शिंदे – फडणवीसांचे ईडी सरकार अल्पकाळाचे असल्याची टीका शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी केली.औरंगाबाद येथे विविध विकासकामांच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते.

पन्नास खोके एकदम ओक्के अशी घोषणा दिल्यावर बंडखोर आमदार तुम्हाला पाहिजे का? असे म्हणतात. म्हणजे यांनी अनुभव घेतला आहे. विकलेल्या वस्तूवर जसा आपला हक्क नसतो, तसा या आमदारावर आता सर्वाधिकार भाजपचा आहे. मुख्यमंत्री लिहलेले भाषण आणि पोकळ घोषणा करतात. त्याप्रमाणे हिंदुत्व मुद्दा समोर करुन मंत्रिपदासाठी उतावीळ आमदार, बिनमहत्त्वाचे खात्याच्या मंत्र्यांची कागदावरच विकासकामे सुरू आहे.

आमदार फुटू नये यासाठी पूर्णपणे मंत्रिमंडळ विस्तार करत नाही. बंडखोर आमदारांना आणि शिवसेनेने हकालपट्टी केलेल्या पदाधिकारी यांना आमिषे दाखवली जात आहे. मात्र जनता येणाऱ्या निवडणूकित बंडखोरांना जागा दाखवून देईल, असा विश्वास खैरे यांनी व्यक्त केला.

या भूमिपूजनप्रसंगी

उपजिल्हाप्रमुख संतोष जेजुरकर, अनिल पोलकर, विधानसभा संघटक रेणुकादास वैद्य, शहरप्रमुख विश्वनाथ स्वामी, रविंद्र निकम, बप्पासाहेब जाधव, माजी नगरसेवक मकरंद कुलकर्णी महिला आघाडीच्या जयश्री लुंगारे, मीरा देशपांडे, विद्या अग्निहोत्री, सीमा गवळी, अंजना गवई, संगीता पाठक,वीरभद्र गादगे, राजु इंगळे, सोपान बांगर,रघुनाथ शिंदे,विजयसिंह राजपूत, बद्रीनाथ ठोंबरे, मंगेश भालेराव, अरुण गव्हाड, राजेंद्र खंडागळे,आशिष पवार, सुरेश कर्डिले, प्रतिक अंकुश, गुरुपाद पडशेट्टी, उद्योजक ज्ञानेश्वर खर्डे, किशोर राजपूत, चंद्रकांत गवई, शिवा खंडागळे, किरण पाटील, योगेश जस्वाल, नानासाहेब शिंदे,बाळकृष्ण मते, औटी, विठ्ठलराव टेहरे, अंबादास कवरे, आशिष पवार, रवी तांगडे, थोरवे, प्रशांत सारडा, माधव मोराळे, अभिजीत खंडागळे, अमित औटी, शिवकुमार देशमुख, नितीन मोहिते, निखिल दंडे, संतोष खंबाट, जयानंद खंडागळे, संतोष दीक्षित, संतोष कांबळे, शिवकुमार देशमुख, अर्जुन बारवाल, प्रशांत भालेराव,मंगेश वाघ, रणजीत बागुल, कचरू काथार, बसराज राजपूत, माधव लोखंडे, पंकज पासवान, शंकर भारती, निलेश थोरवे, सुभाष पुजारी, भगवान राऊत, वसंत जाधव, मदनलाल खरे, उमेश शिंदे, मिलिंद भिते आदींसह परिसरातील नागरिक, शिवसैनिकांची उपस्थिती होती.


 

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम