
लायन्स च्या शिबिरात ७० पेक्षा जास्त रुग्णांची तपासणी व उपचार
अमळनेर(प्रतिनिधी)
लायन्स क्लब अमळनेर तर्फे घेण्यात आलेल्या शिबिरात तालुक्यातील ७० पेक्षा जास्त रुग्णांवर मूत्रपिंड व मूत्रविकार तपासणी अंतर्गत तपासणी व उपचार करण्यात आले.
सकाळी १० वाजता लायन्स प्रेसिडेंट योगेश मुंदडे यांच्या हस्ते शिबिराचे उदघाटन करण्यात आले. शिबिरात मूत्रपिंड व मूत्रविकार तज्ञ डॉ.निखिल शिंदे यांनी रुग्णांवर उपचार केले.यावेळी रुग्णांना योग्य सल्ला देण्यात आला तसेच काही रुग्णांवर उपचार देखील करण्यात आले.या शिबिरामुळे मूत्रपिंड व मूत्रविकार संबंधित आजार असलेल्या रुग्णांना काही प्रमाणात दिलासा मिळाला.७० पेक्षा जास्त रुग्णांनी शिबिराचा लाभ घेतला.
यावेळी लायन्स प्रेसिडेंट योगेश मुंदडे,ट्रेझरर अनिल रायसोनी,प्रोजेक्ट चेअरमन डॉ.सुमित सूर्यवंशी,लायन्स सदस्य डॉ.मिलिंद नवसारीकर,प्रदीपभाऊ जैन,येझदी भरुचा,पंकज मुंदडे,एमजेएफ विनोद अग्रवाल,जितेंद्र जैन,दिलीप गांधी,डॉ.रवींद्र कुलकर्णी, डॉ.मंजिरी कुलकर्णी,राजेशभाई शहा,अजय हिंदुजा,रुपेश मकवाना, जितू गोहिल,नितीन विंचूरकर,हेमंत पवार,चेतन जैन,डॉ.किशोर शहा, शेखर धनगर,लिओ प्रेसिडेंट हरिओम अग्रवाल तसेच लायन्स व लिओ चे इतर सदस्य उपस्थित होते.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम