श्रावण महिना असल्याने महादेव भक्तांची मोठ्या प्रमाणावर गर्दी

बातमी शेअर करा...
  • कजगांव ता. भड़गांव येथील मनमाड कंपनी भागातील व जुन्या हायस्कुल जवळील पुरातन कालीन महादेव मंदिरात सध्या श्रावण महिना असल्याने महादेव भक्तांची मोठ्या प्रमाणावर गर्दी  पाहायला मिळत आहे. मंदिरात सकाळपासून भाविकांनी दर्शनासाठी व शिव अभिषेक साठी गर्दी दिसून येते हे पुरातन कालीन महादेव मंदिर श्रावण सोमवार सह संपूर्ण श्रावण महिना गजबजले असते कजगांव सह परिसरातील अनेक भाविक मोठ्या आनंदाने येतात भविकांची प्रत्येक मनोकामना पूर्ण होते असा भविकांचा विश्वास आहे. भविकांनी केलेला प्रत्येक नवस येथे पूर्ण होतो त्यामुळे भाविक येथे मोठ्या आनंदाने महादेव मंदिरात नवस कबुल करतात व येथे श्रावण महिन्यात गांवातील व परिसरातील अनेक भाविक आपला नवस फेडण्यासाठी येतात हे मंदिर जागतीज्योत असल्याचे भाविक सांगतात ह्या मंदिराचा इतिहास पहिला तर येथे कधिकाळी साधारण चाळीस ते पन्नास वर्षांपूर्वी लग्नसराइत दिवसाला अनेक विवाह व्हायचे त्यामुळे येथे परिसरातील जवळपास चाळीस ते पन्नास खेड़े वरील लोक यायचे व लग्न समारंभ मोठ्या आनंदाने पार पाडायचे मात्र काळानुरूप परिस्थिति बदलत गेली व येथील विवाह कमी होत गेले मात्र आजही येथे अनेक भाविक मोठ्या प्रमाणात येतात येथील निसर्गरम्य वातावरणात भाविक आपला वेळ घालवतात मंदिर परिसरात पूर्वी शारदा माध्यमिक विद्यालय होते व अनेक विद्यार्थी मोठ्या भक्ति भावाने पूजा अर्चा करीत असे मात्र विद्यालयाची जागा बदलल्याने येथे विद्यार्थीचे येणे जाणे कमी झाले मात्र श्रावण महिन्यात अनेक भाविक हे नचुकता दर्शनासठि येतात मंदिराच्या परीसरात पुरातन पिंपळाचे व वळाचे झाड असून ह्या झाडांमुळे मंदिर परिसरात कुठल्या ऋतुत अत्यन्त थंड हवेशीर वातावरण अनुभवायला मिळते तसेच दरवर्षी शेवटच्या श्रावण सोमवारी ग्रामस्थांच्या वतीने येथे महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते.
बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम