सेंट्रल बँकेत कर्मचारी वाढवण्यासाठी ग्रामस्थांचे निवेदन

सेंट्रल बँकेत कर्मचारी वाढवण्यासाठी ग्रामस्थांचे निवेदन, मागणी मान्य न झाल्यास ग्रामस्थांचा ठिय्या आंदोलनाचा इशारा कजगाव ता भडगाव येथील सेंट्रल बँकेच्या कजगाव शाखेत कर्मचारी संख्या वाढण्याच्या मागणीसाठी कजगाव ग्रामस्थांनी शाखा अधिकारी सुरेश कुमार यांना निवेदन दिले आहे निवेदनात म्हटले आहे की गेल्या काही दिवसांपासून सेंट्रल बँकेच्या कजगाव शाखेत पुरेशे कर्मचारी नसल्याने ग्राहकांना पुरेशी सेवा देण्यासाठी बँकेला ही मोठी कसरत करावी लागत आहे पैसे काढणे पुस्तकाची एन्ट्री करण्यास विविध अडचणी येत आहे त्यामुळे जेष्ठ नागरिकांसह अनेकांना अडचणी येतात त्यामुळे आपल्या शाखेत कर्मचारी संख्या वाढवण्यात यावी यासाठी आपण प्रयत्न करावेत व ही बाब बँकेच्या वरिष्ठांच्या निदर्शनास आणून द्यावी तसेच आमच्या निवेदनाची वरिष्ठ नक्कीच दखल घेतील अशी अपेक्षा ही ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे तरी दिनांक १० जून पर्यंत बँकेत कर्मचारी संख्या न वाढल्यास आम्ही बँकेसमोर ठिय्या आंदोलन करू असे ही निवेदनात म्हटले आहे यावेळी माजी ग्रा प सदस्य अनिल महाजन माजी सरपंच मनोज धाडीवाल ग्रा प सदस्य अनिल टेलर आशिष वाणी यशवंत मोरे दिनेश पाटील इसाक बागवान कैलास पवार दानिश खाटिक सचिन मिस्तरी सागर कुमावत भूषण शेंडे निवृत्ती पवार व असंख्य ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते सदरील निवेदन हे जळगाव लोकसभेचे खासदार उन्मेष पाटील भडगाव पाचोरा विधानसभेचे आमदार किशोर पाटील व जळगाव येथील सेंट्रल बँकेच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांना पाठवले आहे त्यामुळे लवकरच बँकेतील कर्मचाऱ्यांची संख्या वाढेल अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे

बातमी शेअर करा...
बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम