*एस.टी.च्या ७४व्या वर्धापनदिनानिमित्त अखिल भारतीय ग्राहक पंचायत तर्फे शुभेच्छा*

बातमी शेअर करा...

अमळनेर (प्रतिनिधी )१ जून २०२२ रोजी एस.टी.च्या ७४व्या वर्धापन दिनानिमित्त व तीची म्हणजेच अमृत महोत्सवी वर्षात लवकरच पदार्पण होणार आहे त्या निमित्ताने अखिल भारतीय ग्राहक पंचायत अंमळनेर तर्फे महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या आगार व्यवस्थापक(एस.टी. डेपो मॅनेजर) सौ. अर्चना भदाणे यांना पुष्पगुच्छ व पेढे देऊन उपस्थित सर्व कर्मचारी बंधू-भगिनींना याप्रसंगी हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्यात. एस.टी.चे लोकांच्या पसंतीस उतरलेली म्हणजेच लालपरीचे सेवेचे अमृत महोत्सवी वर्षाचे दिमाखदार पद्धतीने स्वागत करण्यात आले. एसटी स्टँडच्या फलाटावर सुंदर रीतीने स्वागत रांगोळी काढण्यात आलेली होती. मोठ्या संख्येने कर्मचारी वर्ग व प्रवासी यावेळी उपस्थित होते. ग्राहक पंचायती तर्फे एस.टी. महामंडळाची अशीच उत्तरोत्तर प्रगती व भरभराट होवो अशी सदिच्छा व्यक्त करण्यात आल्या. याप्रसंगी आगार व्यवस्थापक सौ. भदाणे यांनी सांगितले की १ जून १९४८ रोजी पुणे तेअहमदनगर या मार्गावर सर्वप्रथम एसटी बसचा प्रवास सुरू झाला. ते आजपर्यंत काही अडथळे सोडून अव्याहतपणे सुरू आहे.एस.टी महामंडळ प्रवाशांच्या सेवे करिता आणि सोयीसाठी कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले. याप्रसंगी स्थानक प्रमुख श्री.सी.एस .चौधरी, कार्यशाळा प्रमुख श्री. पंकज साळुंखे, आगार लेखाकार श्री .बी. सी. महाजन आणि कामगार संघटनेचे श्री एल. टी.पाटील आदी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्राहक पंचायत तर्फे अध्यक्ष एडवोकेट सौ. भारती अग्रवाल, जिल्हा निरीक्षक मकसूद बोहरी, जिल्हा बँकिंग व सायबर प्रमुख श्री विजय शुक्ल, जिल्हा ऊर्जा समिती प्रमुख श्री सुनील वाघ, कोषाध्यक्ष सौ वनश्री अमृतकर, उपाध्यक्ष सौ स्मिता चंद्रात्रे आणि जयंतीलाल वानखेडे आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते अशी माहिती सौ मेहराज बोहरी यांनी कळविली आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम