स्माईल प्लीज फाऊंडेशनतर्फे पथराड शाळेत शालेय साहित्य वाटप*

*स्माईल प्लीज फाऊंडेशनतर्फे पथराड शाळेत शालेय साहित्य वाटप* कजगाव येथून जवळच असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पथराड येथे आज रोजी गुरुपौर्णिमेचे अवचित साधून स्माईल प्लीज फाऊंडेशनच्या वतीने शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्याना वही,पेन, पेन्सिल, खोडरबर, शार्पनर वाटप करण्यात आले .मागील चार ते पाच वर्षांपासून या फाऊंडेशनच्या वतीने पथराड शाळेच्या विद्यार्थ्याना नियमितपणे शालेय साहित्य वाटप करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे या वर्षीही गुरुपौर्णिमेचे अवचित्य साधून शालेय साहित्य वाटप व शिक्षक सत्कार करण्यात आले त्यावेळी विद्यार्थ्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला हे त्यांच्या चेहऱ्यावरून दिसून येत होते . स्माईल प्लीज फाऊंडेशन हे गुढे येथील वर्गमित्रांचा ग्रूप असून त्या ग्रूप मधील सर्व मित्रांनी दर महिन्याला आपल्या कमाइतील काही रक्कम ते या स्माईल प्लीज फाऊंडेशन मधे जमा करतात .व वर्षभरात जमा झालेल्या रकमेतून सर्वजन मिळून शाळेतील विद्यार्थ्याना शालेय साहित्य खरेदी करतात व आपल्या तालुक्यातील गरजू विद्यार्थी असलेल्या शाळांची निवड करतात व त्या शाळेत स्वतः जाऊन विद्यार्थ्याना शालेय साहित्य वाटप करतात .स्माइल प्लीज फाऊंडेशन च्या या उपक्रमाचे परिसरात नेहमीच कौतुक होत असते . आज जि. प. शाळा पथराड येथे एकूण शंभर विद्यार्थ्याना स्माईल प्लीज फाऊंडेशन च्या वतीने शालेय साहित्य वाटप करण्यात आले . शाळेत सर्वप्रथम स्माईल प्लीज फाऊंडेशन च्या सर्व सदस्यांच्या उपस्थितीत सरस्वती माता व साने गुरुजी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले तद्नंतर सर्व सदस्यांचे गुलबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले .स्माईल प्लीज फाऊंडेशन च्या वतीने आनंदा महाजन आणि राहुल महाजन यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना फाऊंडेशन चा उद्देश व कार्य याविषयी माहिती दिली .गुरुपौर्णिमेनिमित्ताने स्माईल प्लीज फाऊंडेशनच्या वतीने शाळेतील सर्व शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. सदर कार्यक्रमास गावातील शिक्षणप्रेमी भाऊसाहेब पाटील,शा.व्य.स.अध्यक्ष सोपान पाटील, स्माईल प्लिज चे सदस्य योगेश माळी, विजय माळी, आनंदा महाजन, राहुल महाजन,संजय चौधरी,अनिल मोरे,सुधाकर माळी,दीपक पाटिल, स्वप्नील भोकरे, सुमंत भोकरे, प्रभाकर माळी,संकेत जगताप, राकेश डहाळे,मदन महाजन, भाऊसाहेब माळी सर, जितेंद्र चौधरी, , सुदाम पाटील सर शाळेचे मुख्याध्यापक सुकदेव माळी, शाळेतील शिक्षक दीपक भालेराव ,प्रविण पाटील व नंदू पाटील उपस्थित होते .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिपक भालेराव यांनी केले तर आभार प्रविण पाटील यांनी मानले.

बातमी शेअर करा...
बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम