…अखेर खोतकर शिंदे गटात दाखल

उद्धव ठाकरेंशी चर्चा करून निर्णय घेतला

बातमी शेअर करा...

मागच्या काही दिवसांपासून मराठवाड्यातील शिवसेनेचे आक्रमक नेते अर्जुन खोतकर शिंदे गटात जाणार असल्याची चर्चा होती.

BJP add

मात्र या चर्चेला पूर्णविराम देत खोतकर यांनी स्वत: आपण शिंदेगटाला (Eknath Shinde) समर्थन देत असल्याचे आज जाहीर केले.

यावेळी ते भावूक झाल्याचे दिसले. अश्रुधारा त्यांना आवरता आल्या नाहीत आणि हुंदका देत त्यांनी आपली भूमिका जाहीर केली.

शिवसेना प्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी (Uddhav Thackeray) सकाळी सविस्तर चर्चा केली.

माझ्यावर जी परिस्थिती आज आहे त्याबाबत मी त्यांना सविस्तर सांगितले. राऊत, घोसाळकर यांच्याशी बोललो. मी ४० वर्षपासून सच्चा शिवसैनिक आहे.

त्यामुळे काही निर्णय करण गरजेचे होते. मी उद्धव ठाकरेंकडे परवानगी मागितली.

त्या संदर्भात जे काही बोलायचे ते बोलले. त्यानंतर मी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे समर्थन करण्याचा निर्णय घेतला.

काही तरी परिस्थिती आहे म्हणून मी हा निर्णय घेतला आहे, असे अर्जुन खोतकर यांनी जाहीर केलं.

मी केवळ मार्ग शोधला- खोतकर
मी आधी चारवेळा त्यांना फोन केला. व्हॉट्सअप कॉलवरून बोललो. ईडीची पिडा जाईल हे मी कसे सांगू शकतो. मी सहारा शोधला. थोडाफार तरी सहारा मिळेल.

दानवेंविषयी काय म्हणाले खोतकर
रावसाहेब दानवेंनी मला चहा घ्यायला अडीच वर्षाने बोलावले. मी सांगितले मला लोकसभा लढवायची आहे.

ते म्हणाले, सोडता येणार नाही ती जागा आमची आहे. मी म्हणालो हा निर्णय शिंदे आणि फडणवीसांवर सोडा.

…तर मातोश्रीवर देखील जाईल
विधान परिषद वगैरे मी अट ठेवली नाही. ही अफवा असेल. मी एकाही शिवसैनिकाला माझ्यासोबत या असे सांगणार नाही.

मी उद्धव ठाकरेंबद्दल काहीच बोलणार नाही. 40 वर्ष मी पक्षात काम केले आहे.

मी उपनेते पदाचा राजीनामा देणार असून तसा मेसेज टाकला आहे.

एखाद्या प्रसंगाने भेटायची वेळ आली तर मातोश्रीवर देखील जाईल, असेही खोतकर यांनी स्पष्ट केले आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम