आमदार राजूमामा भोळे यांच्या हस्ते ‘श्री शिवाय नमस्त्युभं’ या लघु पुस्तिकेचे प्रकाशन आणि मोफत वितरण
दैनंदिन जीवनातील समस्यांवरील शिव उपायांचा या पुस्तिकेत समावेश
जळगाव l प्रतिनिधी
पवित्र श्रावण महिन्यातील पाचव्या सोमवारी शहरातील जय नगर परिसरातील सिद्ध ॐकारेश्वर मंदिरात दि. 2 सप्टेंबर 2024 रोजी दुपारी आरती झाल्यानंतर
आमदार सुरेश उर्फ राजूमामा भोळे, नूतन मराठा महाविद्यालयाचे माजी प्राचार्य प्रकाश भावसार,
चंद्रकांत घाटगे, राम काळकर, किशोर वाणी, राजेंद्र वारखे, रुपेश चौधरी, सौ.अलका प्रकाश भावसार, मालतीताई पाटील, अनुराधाताई वाणी या सर्व मान्यवरांच्या हस्ते मंदिराचे पुजारी दीपक जोशी, जुगलकिशोर जोशी,
आशीष जोशी, बाला शर्मा यांच्याद्वारे विधिवत पूजा करुन दैनंदिन जीवनातील उपयुक्त अनेक शिव उपाय असलेली लघु पुस्तिका ‘श्री शिवाय नमस्तुभ्यं’ चे विमोचन करण्यात आले.
तसेच मंदिर प्रांगणात उपस्थित श्रद्धाळूंना ते नि:शुल्क वितरित ही करण्यात आले. विशेष म्हणजे नुकतेच धर्मनगरी जळगाव येथे शिवकथेची पवित्र गंगा वाहणारे प्रसिद्ध
अंतरराष्ट्रीय कथाकार पू.पंडित प्रदिप मिश्रा यांच्या प्रवचनांवर आधारित व दैनंदिन जीवनातील उपयुक्त अनेक शिव उपाय असलेली ही लघु पुस्तिका ‘श्री शिवाय नमस्त्युभं’ होय.
या बहुपयोगी लघु पुस्तिकेचे नि:शुल्क वितरण शहरातील विविध 21 शिवमंदिरांमधून करण्यात येत आहे.
माहिती देताना जळगाव शहराचे आमदार सुरेश ऊर्फ राजूमामा भोळे म्हणाले की, या उपयुक्त अशा पुस्तिकेत शिवशंकराच्या पूजेद्वारे दैनंदिन जीवनात उद्भवणार्या समस्यांवर सोपे उपाय
पू.पंडित प्रदिप मिश्रा यांच्या प्रवचनातून सांगण्यात आले असून, त्यामध्ये दर सोमवारी शिव अभिषेक केल्याने होणारे फायदे,
मंत्र फायदे याविषयी तसेच रुद्राक्षाचा महिमा आदि महत्त्वपूर्ण माहिती साध्या आणि सोप्या भाषेत दिलेली आहे.
भक्तांनी ‘श्री शिवाय नमस्तुभ्यं’ ही लघु पुस्तिका वाचून त्याचे अभ्यास करुन ती आचरणात आणण्याचे आवाहनही यावेळी आ.भोळे यांनी केले.
हे हि वाचा👇
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम