कजगाव सबस्टेशच्या परिसातील यार्डाला आग

कजगाव ता.भडगाव येथील सबस्टेशन यार्डा मधील वाढलेल्या गवताला व घानेरीला सबस्टेशन मधील उच्चदाब वीज वाहिनेवर झालेल्या स्पारकीन ची ठिणगी गवतावर व घाणेरीवर पडल्या ने आग लागली सदर घटना विजवितरण च्या कर्मचाऱ्यांच्या लक्षात येताच आग ओकत असलेल्या उन्हात लागलेली आग अथक प्रयत्न करत आटोक्यात आणली यात ग्रामपंचायत कर्मचारी देखील धाऊन आल्याने आग विझविण्यासाठी मदत झाली अन्यथा संपूर्ण सबस्टेशन व आजूबाजूचा परिसर ह्या आगीत जळुन खाक झाला असता बाबत सविस्तर माहिती अशी की कजगाव भडगाव या मार्गावर विज वितरण चे सबस्टेशन आहे अत्यंत मोठ्या जागेत हे सबस्टेशन विस्तारले असुन येथेच अभियंता, लाईनमन,ऑपरेटर,सह काहि कर्मचारी साठी एक बिल्डिंग देखील उभी आहे मात्र या विस्तारलेल्या सबस्टेशन च्या यार्डात गवत,घाणेरी,बाभळाची झाड व इतर काहि झाडाझुडप वाढली आहेत या वाढलेल्या झाडाझुडपात चालणे देखील मुश्किल आहे अशा या सबस्टेशन च्या यार्डात दि.२ रोजी दुपारी उच्च वीज वाहिनी वरील स्पारकीन ची ठिणगी सुकलेल्या गवतावर पडल्याने गवत सह घाणेरी व इतर सुकलेल्या झाडाझुडपानी पेट घेतल्याने सबस्टेशन च्या यार्डात आग लागली दरम्यान दुपारची धगधगणारे ऊन वाहणारा वारा या मुळे आग वाढू लागली सदर प्रकार सबस्टेशन मध्ये ड्युटीवर असलेल्या कर्मचाऱ्यांना लक्षात येताच पाणीच्या सहाय्याने आग विझविण्यासाठी प्रयत्न केले काहि अग्नी विरोधक बंब ने फायर करत आग विझविण्यासाठी प्रयत्न सुरू असतांनाच काहि ग्रामपंचायत चे कर्मचारी देखील हजर झाल्याने व शेजारील शेतातील शेतकरी मदतीसाठी धाऊन आल्याने काहि वेळा नंतर आग आटोक्यात आली अन्यथा या आगीत संपूर्ण सबस्टेशन जळुन खाक झाले असते याची मोठी झळ आजूबाजूला मोठ्या प्रमाणावर बसु शकली असती कारण सबस्टेशन च्या लागुनच पेट्रोल पंप आहे तर दुसरे पेट्रोलपंप रोड ओलांडुन दुसऱ्या बाजूला आहे याची मोठी झळ गावाला व पेट्रोलपंपाला बसली असती संपुर्ण यार्डात घाण सबस्टेशन च्या पुर्ण यार्डात गवत घाणेरी झाडाझुडप यांचं साम्राज्य वाढले आहे या मुळे उन्हाळ्यात हिवाळ्यात आगीचा धोका तर पावसाळ्यात सरपटणाऱ्या प्राण्यांचा धोका हे सारं चित्र समोर दिसत असल्या नंतर देखील यार्डातील स्वच्छते बाबत इतके निष्काळजीपणा का? असा प्रश्न लागलेल्या आगी मुळे नागरिकांत चर्चिला जात आहे प्रसंगी अभियंता बाहेर सब स्टेशन च्या यार्डात आग लागली त्या वेळी कजगाव सबस्टेशन चे अभियंता कार्यालयात हजर नव्हते आगीने रुद्ररुप धारण केले असते आग आटोक्यात आलीच नसती तर यास जबाबदार कोण राहिले असते या साऱ्याच बाबीची चौकशी होणे गरजेचे असल्याचे नागरिकांत चर्चा आहे

बातमी शेअर करा...
बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम