नुपूर शर्मा विरोधात कडक कारवाई ची मागणीचे निवेदन

बातमी शेअर करा...

अमळनेर (आबिद शेख ) येथील ऑल इंडिया मजलीस ऐ इत्ताहादुल मुस्लिमीनच्या वतीने भाजपच्या नेत्या नुपूर शर्मा यांनी इस्लाम धर्मांचे संस्थापक प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या विरोधात अपशब्द वापरले म्हणून त्यांच्या विरोधात कडक कारवाई करावी अशी मागणीचे निवेदन उपविभागीय अधिकारी उप विभाग अमळनेर यांच्या मार्फत देशाचे राष्ट्रपती महोदय रामनाथ कोंविदजी यांना देण्यात आले लेखी निवेदनात म्हटले आहे की
भारतीय जनता पक्षाच्या महिला नेत्या नुपूर शर्मा यांनी इस्लाम धर्मांचे संस्थापक प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या विषयी अपशब्द वापरले व संपूर्ण जगातील मुस्लिम बांधवांची भावना दुखावल्या गेल्या आहेत महाशयांना कळकळीची व नम्र विनंती करण्यात येते की नुपूर शर्मा यांच्या विरोधात कडक व सक्तीची करवाई करून तात्काळ अटक करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे यावेळी ए आय एम आय एम पक्षाचे शहराध्यक्ष हाजी सईद शेख, उपाध्यक्ष कलीम शेख, हाजी नसीरोदीन शेख, अल्ताफ राजा, अल्तमश शेख, आकीब सैय्यद, मुस्तकिम मान्यार ,कलीम शेख, शाहिद सह आदि उपस्थित होते

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम