यवतमाळ दि.२० ऑगस्ट | महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री मा.ना.अब्दुल सत्तार अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी विदर्भ व मराठवाडा दौऱ्यावर आहे ,त्यांनी अनेक ठिकाणि जाऊन नुकसानीची पाहणी करत सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे वस्तुनिष्ठ पंचनामे करण्याचे अधिकाऱ्यांना निर्देश दिले.
आज सकाळी 7 पासून यवतमाळ जिल्ह्याचा दौरा सुरू होता दौऱ्यांतर्गत सायं 7 च्या सुमारास उमरखेड तालुक्यातील सुकळी येथे पाहणी करतांना अब्दुल सत्तार यांनी शेतकरी बघिणीला सांगितले ताई अजून खुप गाव पाहणी करण्याचे बाकी आहेत आम्ही अजून जेवण सुद्धा केले नाही यावर त्या शेतकरी बघिणीने आमच्याकडे जेवण आहे पण साहेब आपल्याला आमच्या गरिबांकडचे जेवण चालेल का असे विचारले.यावर मंत्री अब्दुल सत्तार यांनी त्या शेताच्या बांधावर बसून पिठलं-भाकर,कांदा,चटणी व लोंचाचा शेतकाऱ्यासोबत आस्वाद घेतला.
यावेळी मंत्री अब्दुल सत्तार यांचा साधेपणा पाहून उपस्थित सर्वच जण अवाक होऊन गेले.
मंत्री अब्दुल सत्तार यांचा हा पहिला प्रसंग नसून ते दौऱ्यात असतांना सर्व सामान्य माणसाला मोठ्या आस्थेने विचारपूस करून त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतात. अतिवृष्टी पाहणी दौऱ्यात त्यांनी शेतकऱ्यांना धीर दिला. कोरोना संकटात जेष्ठ नागरिक व लहान मुलांना आपल्या हाताने मास्क घालून त्यांनी मास्कचे महत्व पटवून दिले. अनेक वेळा ते चहाच्या टपरीवर बाकावर बसून चहा घेतांना दिसतात.आशा एक ना अनेक प्रसंगातून मंत्री अब्दुल सत्तार यांचा साधेपणा पहायला मिळतो.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम