अभूतपूर्व उत्साहात एतिहासिक”कावड यात्रा”संपन्न

"हर हर महादेवच्या गजराने औरंगाबाद दुमदुमले

बातमी शेअर करा...

 

 

BJP add

औरंगाबाद दिनांक २१ऑगस्ट | विश्वविक्रम प्रस्थापित केलेल्या ऐतिहासिक कावड यात्रेत “हर हर महादेव”- “बम बम भोले” च्या गजराने आज (२१ ऑगस्ट) औरंगाबाद शहर दुमदुमून गेले होते. शहरातील ठीकठिकाणाहून कावड, भगवे ध्वज घेऊन शिवभक्त, हिंदू बांधव नागरिक मोठ्या संख्येने उल्कानगरी येथील ओमकारेश्वर महादेव मंदिरात भल्या पहाटेच एकत्र येण्यास सुरुवात झाली होती. *परंपरा कायम ठेवत मागील ५ वर्षापासून विधान परिषद विरोधी पक्ष नेता जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांच्या संयोजना खाली ही कावड यात्रा काढण्यात येत आहे.* मागील दोन वर्षाच्या काळात कोविड मुळे प्रतिकात्मक कावड यात्रा काढून परंपरा जपण्यात आली होती.

आज सकाळीच अंबादास दानवे, सौ.अनुराधा दानवे यांनी तसेच विभागप्रमुख अनिल लहाने यांच्या हस्ते सपत्नीक ओंकारेश्वर महादेवाची महापूजा आरती करून जलपूजन करण्यात आले, यावेळी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, अंबादास दानवे यांच्या हस्ते कावड पूजन व श्रीफळ वाढवून यात्रेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी महानगर प्रमुख किशनचंद तनवानी, माजी महापौर नंदकुमार घोडेले, त्र्यंबक तुपे, राजू वैद्य ,संतोष जेजुरकर ,राजू राठोड,विजय वाघचौरे ,बाळासाहेब थोरात, विश्वनाथ स्वामी, ज्ञानेश्वर डांगे ,गोपाल कुलकर्णी, सुशील खेडकर, ह भ प नवनाथ महाराज आंधळे,प्रभाकर मते, चंद्रकांत भराट,रमेश दरख,महिला आघाडी जिल्हा संघटिका प्रतिभा जगताप, सुनिता देव,अनिता मंत्री,अंजली मांडवकर, आशा दातार, प्राजक्ता राजपूत, नलिनी महाजन, मीरा देशपांडे, लक्ष्मी नरहिरे,यांची प्रमुख उपस्थिती होती.

यात्रेच्या अग्रभागी भगवान शंकर पार्वतीच्या व भगवान महादेवाच्या शिवलिंगाची स्थापना करण्यात आली होती, यावेळी ओंकारेश्वर मंदिर उल्कानगरी ते खडकेश्वर महादेव मंदिरापर्यंत ठीक ठिकाणी विविध दांपत्यांनी, नागरिकांनी कावड यात्रेचे पूजन केले, संगीताच्या तालावर तरुण मंडळी, महिला माता-भगिनी बेभान होऊन नाचत वाजत वाजत गाजत कावड घेऊन चालत होते. कावड यात्रेच्या अग्रभागी शेकडो महिला डोक्यावर जलकलश घेऊन सहभागी झाल्या होत्या, ठिकठिकाणी हिंदू बांधवांनी फटाक्याची आतिषबाजी, पुष्पवृष्टी करत कावड यात्रेचे स्वागत केले, ही कावड यात्रा ओंकारेश्वर महादेव मंदिर उल्कानगरी – चेतक घोडा. – तानाजी चौक- मोंढा नाका -रविवार बाजार रोड- दिवान देवडी-अंगुरी बाग- संभाजी पेठ मार्गे खडकेश्वर महादेव मंदिरात पोहोचली, या ठिकाणी खडकेश्वर महादेवास जलाभिषेक करण्यात आला, हजारोंच्या संख्येने हिंदू बांधव माता भगिनी कावड यात्रेत सहभागी झाले होते. कावड यात्रेत हर हर महादेव, शंकर भगवान की जय, बम बम भोले या जय जयकारामुळे अवघे संभाजीनगर भगवेमय, भक्तिमय झाले होते. या कावड यात्रेचा हिंदू संघटन करणे, हिंदू संस्कृती, हिंदू सण, व्रतवैकल्ये, रीती रिवाज याची जपणूक करणे हा प्रमुख उद्देश आहे असे संयोजक विरोधी पक्ष नेता अंबादास दानवे यांनी सांगितले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम