कै.शरदचंद्रिका आक्कांच्या स्मृतीदिना निमित्ताने रक्तदान शिबिराचे यशस्वी आयोजन

बातमी शेअर करा...

चोपडा / प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्याच्या माजी शिक्षणमंत्री व चोपड्या तालुक्याच्या भाग्यविधात्या, सातपुड्यातील संजीवनी कै
श्रीमती. शरदचंद्रिका (आकांसाहेब) सुरेश पाटील यांच्या ४१ व्या पुण्यतिथी निमित्ताने महात्मा गांधी शिक्षण मंडळाच्या वतीने श्रीमती शरदचंद्रिका सुरेश पाटील औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालय चोपडा व रक्त संकलन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबीरा चे आयोजन दि ४ डिसेंबर रोजी करण्यात आले होते.

स्व आक्कासाहेबांच्या स्मृतीदिना निमित्ताने दरवर्षी महात्मा गांधी शिक्षण मंडळाच्या वतीने लोकउपयोगीं कार्यक्रम घेण्यात येतात. यंदा च्या रक्तदान शिबिरात तब्बल ८४ जणांनी रक्तदान केले.

शिबिराचे उदघाटन संस्थेचे अध्यक्ष ॲड. भैयासाहेब संदीप सुरेश पाटील यांनी केले.सदर कार्यक्रमासाठी सचिव ताईसहेब डॉ. स्मिता संदीप पाटील व उपाध्यक्ष श्रीमती आशाताई पाटील उपस्थित होत्या. कार्यक्रम स्थळी पदविका फार्मसी च्या विद्यार्थ्यांनी बनविलेले रक्तदानाचे महत्व विषद करणारे पोस्टर सर्वांचे लक्ष वेधत होते.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जळगाव येतील डॉ निलेश पाटील डॉ श्रद्धा पैठणकर डॉ भावेश खडसे श्री लक्ष्मीकांत त्रिपाठी आणि पी आर ओ श्री जितेंद्र पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांचे शिबिरासाठी अनमोल सहकार्य लाभले. सर्व रक्तदात्यांना शासकीय महाविद्यालयाच्या वतीने प्रशस्तीपत्र देण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा गौतम प्र वडनेरे यांचे मार्गदर्शन लाभले.

सदरील कार्यक्रमासाठी प्रबंधक प्रफुल्ल मोरे, प्रा डॉ भरत जैन, प्रा डॉ मो रागीब , प्रा डॉ कुंदन पाटील, प्रा तन्वीर शेख, प्रा तुषार पाटील प्रा पियुष चव्हाण व पदवी व पदविका औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयाच्या सर्व शिक्षक व शिक्षकेतर बंधू भगिनींना परिश्रम घेतले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम