चिनावल ग्रामपंचायतीची ग्रामसभा उत्साहात
गावातील अनेक समस्यांवर ग्रामसभेत चर्चा
सावदा l प्रतिनिधी
चिनावल ता.रावेर ग्रामपंचायतीची महिला व जनरल ग्रामसभा लोकनियुक्त सरपंच ज्योती संजय भालेराव यांच्या अध्यक्षतेखाली महिला व पुरुष यांच्या उपस्थितीत मोठ्या संख्येने उत्साहात पार पडली.
चिनावल ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेच्या सुरुवातीस गावातील मृत झालेले व्यक्ती तसेच नेपाळ दुर्घटनेत जळगाव जिल्ह्यातील मृत्यमुखी पडलेल्या भाविकांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या सभेत गावातील अनेक समस्यांवर चर्चा करण्यात आली.
मागील सभेचे अहवाल वाचन ग्रामसेवक के आर भगत यांनी केले. ग्रामसभेत विविध प्रकारचे महत्त्वाचे ठराव मंजूर करण्यात येऊन त्यावर चर्चा करण्यात आली.
त्यात लिंगायत समाजातील लोकांना स्मशानभूमी साठी जागा देण्यात यावी, सैनिकांना व माजी सैनिकांना त्यांच्या कोणत्याही एका मालमत्ता करावर सुट देण्यात यावी, गावातील अवैध दारू विक्री यापूर्वीच्या ग्रामसभेत बंद करण्यात आली आहे.
आताच्या ग्रामसभेत शासन मान्य दारूचे दुकान गावा बाहेर घेऊन जावे, व गावातील गुटखा विक्री पूर्णपणे बंद करण्यात यावी, विक्री करताना कोणी आढळल्यास रुपये 5 हजार दंड वसूल करण्यात यावा.
असे ठरले तसेच ज्या लोकांना धान्य मिळत नाही अशा लोकांना धान्य मिळविण्यासाठी वरीष्ठ कार्यालय व अन्न व नागरी पुरवठा मंत्रालय मुंबई याच्याकडे पाठपुरावा करावा असे ठरले.
सन 2025 -2026 चा विकास आराखडा तयार करण्यात आला. यावेळी तंटा मुक्ती अध्यक्षपदी जितेंद्र सोनजी नेमाडे यांची निवड करण्यात आली.
तसेच गावातील सर्प मित्र कल्पेश साळुंके यांचा सत्कार सरपंच यांच्या हस्ते वडाचे रोप देऊन करण्यात आला व त्यांना एक सुरक्षित किट त्यांना ग्रामपंचायती तर्फे देण्यात यावे असे ठरले.
ज्या ग्रामपंचायत कर्मचार्यांनी उत्कृष्ट कामे केली त्यांचा सुद्धा ग्रामस्थांच्या हस्ते वडाचे रोप देऊन सत्कार करण्यात आला.
व शेवटी राष्ट्रगीत म्हणून ग्रामसभा संपविण्यात आली.
यावेळी गावातील अनेक स्त्री पुरुष तसेच चंद्रकांत भंगाळे, संजय भालेराव, सदस्य शेषराज भालेराव, हेमांगी भंगाळे, ममता बोरोले ग्रामपंचायत कर्मचारी सचिन लोखंडे, राहुल नेमाडे उपस्थित होते.
हे हि वाचा👇
चेक बाऊन्स प्रकरणी हरियाणाच्या आरोपीस अटक
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम