चोरट्यांनी महादेव मंदिरानंतर आता ऋषीबाबा मंदिराला केले टार्गेट

चोरट्यांनी महादेव मंदिरानंतर आता ऋषीबाबा मंदिराला केले टार्गेट कजगाव ता भडगाव येथे सध्या चोरट्यांनी मंदिरांनाच टार्गेट केल्याचे दिसून येत आहे महादेव मंदिरात काही साहीत्य चोरी झाल्याचे आढळून आल्यानंतर आता चाळीसगाव रस्त्यावरील ऋषीबाबा मंदिरात चोरी झाल्याची घटना उजेळात आली आहे चोरी झालेल्या ऋषीबाबा मंदिरातून तीन किलो वजनाची तांब्याची घागर पाच किलोचा पितळी घंटा व चार छोटे घंटे चोरीला गेले आहेत विशेष म्हणजे ऋषीबाबा मंदिर हे रहदारीचे ठिकाण असून येथून नेहमी शेतकऱ्यांसह ग्रामस्थांचा वावर असतो मात्र अश्या रहदारीच्या ठिकाणी भर दुपारी ही घटना घडल्याचे संगितले जात आहे महादेव मंदिरांतर आता ऋषीबाबा मंदिराला भामट्यांनी टार्गेट केल्याने ग्रामस्थांची चिंता व्यक्त केली आहे

बातमी शेअर करा...
बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम