बदलापूरच्या सुरज स्केटिंग अकॅडेमीच्या ४१ मुलांनी केला विश्वविक्रम, यात अमळनेरचा साडे पाच वर्षीय तनिष गुरव याचा समावेश

बातमी शेअर करा...

अमळनेर तालुका प्रतिनिधी

बेळगाव येथे सलग ९६ तास स्केटिंग करून ४१ मुलांनी गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नाव नोंदवून आपले नाव उज्वल केले.
बेळगाव येथे पार पडलेल्या ९६ तास सलग रोलर स्केटिंग करण्याचा विक्रमामध्ये ४९६ खेळाडूंचा समावेश होता. हा कार्यक्रम २८-मे -२०२२ ते ०३-जून-२०२२ या काळात शिवगंगा रोलर स्केटिंग क्लब यांच्या मार्फत घेण्यात आला त्यात बदलापूरच्या सुरज स्केटिंग अकॅडेमिच्या ४१ मुलांनी आपले नाव गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये आपले व आपल्या बदलापूर शहराचे नाव उज्वल केले आहे. या सर्व मुलांना प्रशिक्षण देणारे शिक्षक सौ. मनीषा कौशिक गरवालीया व सुरज गरवालीया यांनी दिले.
यात आपल्या अमळनेर तालुक्यातील आरटीओ इन्स्पेक्टर सुनील बाबुराव गुरव व दत्तात्रय बाबुराव गुरव यांचे नातू, कमलेश उर्फ बाळू गुरव यांचे पुतणे तर मिलिंद(नानू)गुरव यांचे चिरंजीव कु.तनिष मिलिंद गुरव सध्या बदलापूर येथे स्थायिक या साडेपाच वर्षीय चिमुरड्याने अमळनेर शहराचे नाव उंचीवर नेण्याचे काम केले आहे.अमळनेरच्या सर्व मान्यवरांनी या सर्व मुलांचे सर्व स्तरातून अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम