जामनेर शहरातील वार्ड क्रमांक 1 इंदिरा आवास विकासासाठी झाले वंचित

नागरिकांनी मुख्याधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे दिला आमरण उपोषणाचा इशारा

बातमी शेअर करा...

जामनेर / प्रतिनिधी

BJP add

जामनेर शहरातील नगरपालिका हद्दीतील इंदिरा आवास दलित वस्ती परिसर बहुतांश सर्वच सुविधां पासून वंचित असून नगरपालिका स्थापनेपासून या परिसरातील विकासकामांचा नगरपालिकेला विसर पडलेला दिसून येत आहे.या परिसरातील विकासकामांना प्राधान्य देण्यात यावे यासाठी या भागातील त्रस्त रहिवाश्यांनी नगरपालिकेचे मुख्याधिकारी-चंद्रकांत भोसले यांनी मागण्यांचे निवेदन दिले आहे.

●सविस्तर वृत्त असे की,जामनेर नगरपालिका स्थापन होऊन 15 वर्षांचा कालावधी उलटत आहे. नगरपालिका हद्दीतील जामनेर-भुसावळ रोडवर असलेल्या इंदिरा आवास परिसरातील दलित वस्ती मध्ये आजघडीला शेकडो कुटुंब वास्तव्यास आहेत. नगरपालिकेने शहरातील बहुतांश भागांच्या विकासकामांवर मेहेर नजर केली असून अनेक विकासकामे प्रगतीपथावर सुरु आहे.मात्र इंदिरा आवास भागातील दलित वस्तीला विकासकामांचा स्पर्श सुद्धा झाला नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. मुख्याधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की,नगरपालिका स्थापन होऊन 15 वर्षांचा कालावधी उलटत असून या दलित वस्ती भागात नगरपालिकेकडून सार्वजनिक जिम, अंगणवाडी,रस्ते,गटारी व आरोग्यविषयक या सारख्या कुठल्याही प्रकारच्या सोयीसुविधा देण्यात आलेल्या नसल्याने येथील रहिवाश्यांना असंख्य अडचणींना सामोरे जावे लागत आहे. तसेच वयोवृद्ध,लहानसहान मंडळींना बसण्या-उठण्या साठी असलेल्या नगरपालिकेच्या प्लॉट नं- 186,187, 188,189 “ओपन स्पेस”वर काहींनी बेकायदेशीर अतिक्रमण केले आहे, सदरचे झालेले अतिक्रमण काढून हे”ओपन स्पेस” प्लॉट परिसरातील नागरिकांसाठी बसण्या-उठण्यासाठी उपलब्ध करुन देण्यात यावे,तसेच या भागातील रस्ते,गटारी यासारखी विकासात्मक कामे त्वरीत हाती घेऊन नागरिकांना त्रास मुक्त करावे अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आलेली आहे.सदर निवेदनाची गांभीर्याने दखल न घेतल्यास लवकरच या भागातील सर्व नागरिक सहकुटुंब नगरपालिके समोर आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा ही निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.निवेदन देतेवेळी दलित वस्ती भागातील असंख्य त्रस्त महिला,मुले,व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.निवेदनावर-जितेंद्र शिवराम झाल्टे,चंद्रकांत गोपाल माळी,ईश्वर किसन माळी,निलेश प्रभाकर नानोटे,परमेश्वर विजय सोनवणे,भिका माळी,गौरव शालिग्राम माळी यासह असंख्य रहिवाश्यांच्या स्वाक्षरी आहेत

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम