जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलमध्ये “नाताळ” सण उत्साहात साजरा

बातमी शेअर करा...

जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलमध्ये “नाताळ” सण उत्साहात साजरा

 

 

विद्यार्थ्यांच्या नाटिकासांताक्लॉजची धमालयेशू ख्रिस्ताच्या जन्माचा देखावा ठरला आकर्षण

 

जळगाव, : शहरालगत असलेल्या सावखेडा येथील जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलमध्ये नाताळ सण (ख्रिसमस) मोठ्या उत्साहात व आनंदी वातावरणात साजरा करण्यात आला. या प्रसंगी शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करत नाताळचा आनंद द्विगुणित केला.

कार्यक्रमाची सुरुवात स्कूलच्या मुख्याध्यापिका क्रिस्टाबेल परेरा यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना सांताक्लॉजचे मुखवटे व खाऊचे वाटप करून करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी प्रभू येशूच्या जीवनावर आधारित भावस्पर्शी नाटिका सादर केली. नाटिकेमधून प्रेमत्यागसेवा व मानवतेचा संदेश देण्यात आला.

मुख्याध्यापिका क्रिस्टाबेल परेरा यांनी विद्यार्थ्यांना नाताळ सणाचे महत्त्व तसेच प्रभू येशू ख्रिस्त यांच्या जीवनातील शिकवणी याबाबत मार्गदर्शन केले. सांताक्लॉजची वेशभूषा परिधान केलेल्या चिमुकल्यांनी ‘जिंगल बेल’ या गाण्यावर ताल धरत सर्वांची मने जिंकली.

यावेळी येशू ख्रिस्ताच्या जन्माचा देखावा सादर करण्यात आला होता. सांताक्लॉजमदर मेरीफादर जोसेफमेंढपाळ व परी अशा विविध भूमिका साकारत विद्यार्थ्यांनी कार्यक्रम अधिक रंगतदार केला.

या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेतील सर्व शिक्षकशिक्षकेत्तर कर्मचारीपालक तसेच स्कूल कमिटी सदस्यांचे मोलाचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे उत्कृष्ट आयोजन केल्याबद्दल जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलच्या संचालिका सौ. पलकजी रायसोनी यांनी विशेष कौतुक केले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम