पंचनामे – गारपीट व पावसाने झालेल्या नुकसानीचे त्वरीत पंचनामे व्हावेत – राष्ट्रवादी

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या वतीने नायब तहसीलदार महाजन यांना निवेदन

बातमी शेअर करा...

बातमीदार l मंगळवार दि. २७ फेब्रुवारी २०२४

चोपडा  – तालुक्यात दि. 26 रोजी रात्री अचानक झालेल्या अवकाळी पावसामुळे व गारपीट तालुक्यातील निंमगव्हाण, चुंचाळे,मामलदे, तांदळवाडी, दोंदवाडे, चहार्डी, हातेड, संपुले व तालुक्यातील इतर भागात दिनांक 26 रोजी विजांच्या कडकडाटासह ढगांच्या गडगटासह बेमोसमी पाऊस पडून शेतकरी वर्गाचे हाताशी आलेले पीक दादर, मका, हरभरा, बाजरी, गहू ह्या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. पंचनामे व्हावेत

त्याचे तात्काळ पंचनामे करून शेतकरी वर्गाला न्याय मिळवून द्यावा यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या वतीने नायब तहसीलदार महाजन यांना निवेदन देण्यात आले. पंचनामे

पंचनामे
निवेदनावर जेडीसीसी बँकेचे संचालक घनश्यामभाई अग्रवाल,तालुकाध्यक्ष बाळासाहेब पाटील, नारायणदादा पाटील माजी सभापती कृ.उ. बा.चोपडा कसबे चे चेअरमन प्रविणभाई गुजराथी, सोनालीताई नारायण पाटील महीला जिल्हाध्यक्ष रावेर मतदारसंघ,गिरीश देशमुख शहर अध्यक्ष,परेश देशमुख,विनोद पाटील सूतगिरणी संचालक,रविंद्र चौधरी, पंचनामे

https://youtu.be/vUtkBQTc1tE?si=q1tfzIgwbxGW8nF_

महिला तालुकाध्यक्ष सविताताई विनोद पाटील,महिला शहर अध्यक्ष स्वातीताई बडगुजर, कार्यध्यक्ष मायाताई महाजन,उपाध्यक्ष जयश्री पाटील,रवींद्र धनगर,मिलिंद सोनवणे,गोपाल दाभाडे,सनी सचदेव,शुभम सोनवणे,आणि ईतर पदाधिकारी यांच्या सह्या आहेत. पंचनामे

हे ही वाचा 👇

अटक – कासव विक्रीच्या प्रयत्नात असलेल्या ३ आरोपींना अटक

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम