बनावट कंपनीमध्ये गुंतवणुकीचे अमिष दाखवून महिलेची ९५ लाखांत फसवणूक

बातमी शेअर करा...

जळगाव : – बनावट कंपनी स्थापन करुन त्यामध्ये अधिक परताव्याचे अमिष दाखवून शिरीन गुलामअली अमरेलीवाला (वय ६५, रा. गजानन कॉलनी) या वकील महिलेने ७५ लाख रुपये गुंतविण्यास सांगितले. महिलेने परताव्यासह ९४ लाख १२ हजार रुपये परत मागितले असता, त्यांना शिवीगाळ करीत जीवेठार मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. महिलेला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी शहर पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार संशयित मनिष सतिष जैन, अतुल सतिष जैन, यशोदा उर्फ यशोमती सतिष जैन (तिघ रा. वश प्लाझा), जाफर खानमजीद खान रा. सुप्रिम कॉलनी, सीए अक्षय अग्रवाल, सेक्रेटरी केतन किशोर काबरा रा. जय नगर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील गजानन कॉलनीत शिरीन अमरेलीवाला या वकील महिला वास्तवयास आहे. त्यांचे यश प्लाझा येथे राहणारे मनिष जैन यांच्या कुटुंबियांसोबत घरोवाचे संबंध आहे. डिसेंबर २०२१ मध्ये मनिषने त्यांना भूमी रत्नम रिअल इस्टेट प्रा. लि. नावाने कंपनी सुरु केली आहे. त्या कंपनीला व्यवहारासाठी रकमेची गरज असल्याने त्या कंपनीत रक्कम गुंतवणुक केल्यास त्यावर प्रतिमहा दीड टक्के परतावा देणार असल्याचे त्यांनेसांगितले. त्या आकर्षक परताव्या लोभामुळे अमरेलीवाला यांनी डिसेंबर २०२१ ते ऑगस्ट २०२२ पर्यंत वेगवेगळ्या बँकेच्या खात्यातून ७० लाख रुपये तर दि. १४ ऑगस्ट २०२२ रोजी ५ लाख रुपये रोख दिले होते.
इतर दोघांच्या नावाने रजिष्टर केली बनावट कंपनी वकील शिरीन अमरेलीवाला यांनी भूमी रत्नम या कंपनीबद्दल तपास केला असता, त्यांना ही कंपनी मनिष जैन यांच्या कुटुंबाशी निगडीत असलेल्या जाफर खान मजिद खान व विजय इंदरचंद ललवाणी यांना हाताशी धरुन तयार केली आहे. कंपनी रजिष्टसाठी खोट्या माहितीची पुर्ततेसाठी सीए अक्षय अग्रवाल, सेक्रेटरी केतन किशोर काबरा यांनी स्वतःच्या फायद्यासाठी अमरेलीवाला यांना फसविण्याचा कट रचून त्यांची फसवणुक केली. त्यानुसार सात जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे

 

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम