बंद घरातून चोरट्यांनी ६६ हजारांचा ऐवज लांबविला
जळगाव :- बंद घर फोडून अज्ञात चोरटयांनी ६६ हजारांचा ऐवज लॅम्पाद केल्याची घटना उघडकीस आली असून याप्रकरणी रामानंद नगर पोलीस स्टेशनला गुन्हादाखल करण्यात आला आहे.
शहरातील संत गाडगेबाबा नगरात नंदकुमार प्रल्हाद कुळकर्णी (वय ७३) हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहेत. २४ डिसेंबर ते ६ जानेवारी दरम्यान त्यांचे घर हे बंद होते. यामुळे या संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी प्रल्हाद कुळकर्णी यांचे बंद घराचे कुलूप तोडून आत प्रवेश करत केला. त्यांच्या घरातून १ तोळा सोन्याचे मंगळसुत्र, कानातील सोन्याच्या रिंगा आणि २ तोळ्याचा सोन्याचा चपलाहार असा एकुण ६६ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेला. सोमवार ६ जानेवारी रोजी सायंकाळी नंदकुमार कुळकर्णी हे घरी आले, तेव्हा त्यांच्या घरात चोरी झाल्याचे उघड झाले. याबाबत त्यांनी रामानंद नगर पोलीसात तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार संजय सपकाळे हे करीत आहे.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम