बरखास्त – …..अखेर बालकल्याण समिती बरखास्त

मासू विदयार्थी संघटनेचे उपोषण मागे; महाराष्ट्र स्टुडंट्स युनियनच्या लढ्याला यश

बातमी शेअर करा...

बातमीदार | शनिवार दि २७ जानेवारी २०२४

बरखास्त – अखेर बालकल्याण समिती बरखास्त

मासू विदयार्थी संघटनेचे उपोषण मागे; महाराष्ट्र स्टुडंट्स युनियनच्या लढ्याला यश

जळगाव – अखेर बालकल्याण समिती बरखास्त करण्यात आली असून याबाबतचे राजपत्र दिनांक २५ जानेवारी रोजी राज्यपाल यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र शासनाचे सचिव वि. रा. ठाकूर यांनी काढले आहेत.

बरखास्त

बालगृह अत्याचार प्रकरणी गुन्हे दाखल असलेल्या बालकल्याण समिती बरखास्त करण्यात यावे या मागणीसाठी महाराष्ट्र स्टुडंट्स युनियनचे राज्य उपाध्यक्ष ॲड. दिपक सपकाळे, जिल्हाध्यक्ष रोहन महाजन, महानगराध्यक्ष प्रथमेश मराठे यांनी

https://fb.watch/pQCQFizKvC/?mibextid=Nif5oz

गेल्या ८ दिवसापासून अन्नत्याग उपोषण सुरु केले होते. दरम्यान बालकल्याण समिती समाप्तीचे आदेश जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी डॉ. वनिता सोनगत यांनी दि. २६ जानेवारी रोजी उपोषणस्थळी येत आदेशाची प्रत देऊन उपोषण सोडले.

सविस्तर असे की,जळगाव जिल्ह्यातील खडके, ता. एरंडोल येथे कै. य. ब. पाटील मुलींच्या बालगृहात लैंगिक शोषणाची गंभीर स्वरुपाची घटना घडल्या प्रकरणी बाल कल्याण समितीचे अध्यक्ष

श्रीमती देवयानी गोविंदवार, सदस्य श्रीमती विद्या बोरनारे व सदस्य संदीप पाटील यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर बालकल्याण समिती वर कारवाई करण्यासाठी विदयार्थी संघटनेने वेळोवेळी तक्रारी करून पाठपुरावा केला होता.

मात्र शासनाला जाग येत नव्हती. त्यानंतर महाराष्ट्र स्टुडंट युनियनने दिनांक १९ जानेवारी पासून उपोषण सुरु केले होते, बालकल्याण समितीवर कारवाई होणार नाही तोपर्यंत अन्नत्याग उपोषण सोडणार नसल्याचे जाहीर केले होते.

https://m.facebook.com/story.php?story_fbid=pfbid02hfuVcNVPxU6EqtPVjL9kgGjHfHJ4FwMosrCSrUoCkUqd9U6xn1BG99UZzrgPjFHHl&id=100086002677324&mibextid=Nif5oz

अखेर बालकल्याण समिती बरखास्त करण्यात आली असून याबाबतचे राजपत्र दिनांक २५ जानेवारी रोजी राज्यपाल यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र शासनाचे सचिव वि. रा. ठाकूर यांनी काढल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले आहे.

हे ही वाचा👇

आदिवासी कोळी जमातीच्या महाआंदोलनास राज्यभरातून प्रचंड प्रतिसाद

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम