
महिन्याभरातच भडगाव वाडे रस्ता गेला खड्यात
महिन्याभरातच वाडे भडगाव रस्ता गेला खड्यात ,आमदारांच्या लोकार्पनापूर्वी रस्त्याचे वाजले बारा. कजगाव ता भडगाव गेल्या काही दिवसांपासून वाडे ते भडगाव खराब रस्त्यामुळे नागरिकांनि नाराजी व्यक्त केली आहे.
कजगाव येथून जवळच असलेल्या कनाशी देव्हारी निंभोरा लोण गोडगाव बांबरुडसह अनेक गाववरून जाणारा वाडे भडगाव रस्ता खराब झाल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ह्या रस्त्यावर मोठमोठी खड्डे पडली आहेत त्यामुळे वाहने चालवणे अत्यन्त जिकरीचे झाले आहे. त्यामुळे अपघातांचे प्रमाणही रस्त्यावर वाढले आहे तर विशेष म्हणजे ह्या रस्त्याचें काम फक्त एक महीन्याच्या जवळपास झाले आहे. त्यामुळे महिन्याभरातच रस्ता खराब झाल्याने नागरिकांनि तीव्र संतप्त भावना व्यक्त केल्या आहेत. साधारण महीना उलटला आणि रस्ता खराब झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे तर रस्त्यावरील बऱ्याच साईपड्या ह्या घराब झाल्या आहेत त्यामुळें येन पावसाळ्यात ह्या रस्त्यावर शेती असलेल्या शेतकऱ्यांना व विविध कामानिमित्ताने प्रवास करणाऱ्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. साईडपट्या खराब झाल्याने अनेक दुचाकी वाहने घसरण्याचे प्रमाणही वाढले आहे तर खड्डे वाचवण्याच्या नादात अनेक मोठी वाहने एकमेकांवर धडकतात त्यामुळे हा रस्ता पुन्हा उत्कृष्ट पद्धतीने तयार करण्यात यावा अशी मागणी जोरदार होत आहे.
“”””:आमदारांच्या लोकार्पणापूर्वीच रस्त्याचे वाजले बारा
दरम्यान वाडे भडगाव रस्ता हा पुर्णपणे खराब झाला आहे महीन्याभरातच रस्त्याचे पूर्णपणे तीन तेरा झाल्याने ग्रामस्थांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे आश्चर्य म्हणजे ह्या रस्त्याचा लोकार्पण सोहळा अजूनही बाकीच असल्याने याकडे आमदार किशोर पाटील यांनी गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे तर आमदारांचे संबधीत अधिकारी व ठेकेदारावर कुठलेच वचक नसल्याचा संतप्त सूर जनसामान्यांमधून व्यक्त होत आहे
प्रतिक्रिया,
बऱ्याच वर्षांनी वाडे भडगाव रस्त्याचे काम झाले मात्र महिना भरातच रस्ता खराब झाला आहे त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे साईड पट्यांचे काम अजूनही अपूर्ण स्थितीत आहे खराब झालेल्या रस्त्यामुळे वाहने चालवणे अवघड झाले आहे नेहमी भडगाव व इतर ठिकाणी येण्याजाण्यासाठी ह्या सत्याचा उपयोग होतो
सोमनाथ पाटील बोदर्डे

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम