दै बातमीदार |दि १५ डिसेंबर २०२३
चोपडा येथील एन. एफ.ई मिशन संचलित मिमोसा – क्लारा इंग्लिश मिडियम स्कूलच्या भव्य निसर्ग रम्य प्रांगणात 14 डिसेंबर रोजी चोपडा येथे शाळेच्या संस्थापिका क्लारा लाईफ लेरबर्ग यांच्या जयंतीनिमित्त भव्य तालुकास्तरीय चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धेचे उदघाटन बेथेल चर्च प्रिस्ट इनचार्ज विजय सपकाळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संस्थेचे चेअरमन स्तेफन सपकाळे, प्रमोद हिवाळे, निलेश सपकाळे, समन्वयक सिसिल सपकाळे, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका वेरोणीका सूर्यवंशी, माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका नीलिमा मॅथ्यू हे उपस्थित होते.
या स्पर्धेत तालुक्यातील प्रताप विद्यामंदिर, प्राथमिक व माध्यमिक विभाग, कस्तुरबा माध्यमिक विद्यालय, महिला मंडळ प्राथमिक व माध्यमिक विभाग, चावरा इंटरनॅशनल इंग्लिश मिडियम स्कूल,
तहजीब इंग्लिश मिडियम स्कूल, अँग्लो उर्दू स्कूल, साने गुरुजी विद्यालय, वडती आणि बालमोहन विद्यालय इ. शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता.
परीक्षक म्हणून सुनील बारी, प्राचार्य ए.टी.डी महाविद्यालय, चोपडा , विनोद पाटील व ए. पी. पाटील यांनी कामकाज पाहिले. स्पर्धेत एकूण 1100 विद्यार्थ्यांचा सहभाग होता
व स्पर्धेच्या यशस्वितेसाठी शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम