भडगाव शहर तलाठी कार्यालय स्थलंतरित न करता जुन्या स्थानी पूनर्विकसित करावे : तहसीलदार हिवाळे यांना नागरिकांचे निवेदन

बातमी शेअर करा...

भडगाव/प्रतिनिधी

भडगाव शहर तलाठी कार्यालय स्थलंतरित न करता जुन्या स्थानी च नुतूनीकरण करून नागरिकांना सोयीचे करावे असे निवेदन शहरतील नागरिकांच्या वतीने तहसीलदार मुकेश हिवाळे यांना देण्यात आले.

निवेदनातील आशय असा की, भडगाव शहर तलाठी कार्यालय हे पुर्वी पासुन गावातच होते परंतु ते जीर्ण झाल्यामुळे भडगाव तहसील कार्यालय (बस स्टँड जवळ) येथे तात्पुरता हलविन्यात आलेले होते. परंतु आत्ता जे नवीन तलाठी कार्यालय मंजुरी मिळालेली आहे ते मागील काळात राहिलेल्या तहसीलदार तृप्ती धोडपीसे यांच्या कार्यकाळात नवीन तलाठी कार्यालय मंजुरी व बांधकाम मंजूर केलेले आहे. परंतु हे गावाबाहेर होणार असल्याने गावकरी जनतेला ते लांबणीचे म्हणजे १ ते २ किलोमीटर लांब होणार आहे. ज्या गोरगरीब माता भगिनी, सर्व सामान्य शेतकरी जनतेकडे गाडी घोडी नसेल त्यांना तो लांबचा पल्ला घाटने शक्य नाही व परत जेष्ठ लोकांनी उत्पन्नाचा दाखला असो किंवा अजून त्यांचे कोणतेही शासकीय पगाराचे काम असो त्यांनी इतक्या लांब कसे यायचे जायचे असा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे आपण जे वाक रस्त्याला १/२ किलोमीटर वर मंजूर केलेले तलाठी कार्यालय आहे ते नामंजूर करून जुन्या गावातील बाजार पेठ येथेच ते तलाठी कार्यालय मंजुर करावे व नवीन बांधकाम करावे, अन्यथा आंम्ही आपण मंजूर केलेल्या जागेत तलाठी कार्यालय बांधकाम होऊ देणार नाही. निवेदनावर शहरातील ४०० ते ५०० नागरिकांच्या स्वाक्षरी आहेत.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम