राष्ट्रीय महामार्गाचे काम कासव गतीने

बातमी शेअर करा...

शेत शिवारातील रस्ता असून हा कोट्यावधी रुपये खर्चून करण्यात आलेला राष्ट्रीय महामार्ग आहे.
कजगाव, ता. भडगाव गेल्या तीन वर्षांपूर्वी मोठ्या धूम धडाक्यात जळगाव ते चांदवळ राष्ट्रीय महामार्गाचे काम मोठ्यां उत्साहात सुरुवात करण्यात आले होते मात्र जसजसा काळ गेला तसतसा ह्या राष्ट्रीय महामार्गाचे काम कासव गतीने होऊ लागले त्याचा फटका थेट असंख्य खेड्यावरील नागरिकांना बसला आहे. कारण मोठ्या धूम धडाक्यात सुरुवात झालेल्या कामावर अनेक ठिकाणी मोठं खड्डे दिसून येतात प्रसंगी ह्या महामार्गावर अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे जळगाव चांदवड महामार्गा वरील मृत्यूची संख्या ही डोळे विस्फटून टाकणारी आहे. अनेक ठिकाणी पडलेले खड्डे हे अपघातास आमंत्रण देत असल्याने नागरिकांनि प्रचंड संताप व्यक्त केला आहे पाचोरा ते चाळीसगाव दरम्यान अनेक ठिकाणी रस्ता की खड्डा हेच लक्षात येत नाही. त्यामुळे खड्डे वाचवण्याच्या नादात अनेक ठिकाणी अपघात झाल्याचे आढळुन आले आहे सदरील तयार होणारा रस्ता बऱ्याच ठिकाणी चांगला ही आहे मात्र अनेक ठिकाणी खराब असलेल्या रस्त्याला नेमके कारण काय? व रस्त्याचे काम का थांबले? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे सदरील रस्त्यावर असलेल्या अनेक खड्यांवरून अनेक ठिकाणी धुळीचे प्रमाण ही वाढले आहे त्यामुळे ह्या रस्त्याचा त्वरित निकाल लावावा अशी मागणी जोरदार होत आहे.

BJP add
बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम