शक्ती फाऊंडेशनतर्फे प्रजासत्ताक दिन निमित्त विविध उपक्रम
संविधान गौरव अभियान अंतर्गत सामूहिक संविधान उधे्षिका वाचन
शक्ती फाऊंडेशनतर्फे प्रजासत्ताक दिन निमित्त विविध उपक्रम
संविधान गौरव अभियान अंतर्गत सामूहिक संविधान उधे्षिका वाचन
जळगाव प्रतिनिधी
विवेकानंद नगर येथे शक्ती फाऊंडेशन च्या संस्थापक अध्यक्ष सौ.भारती जि.रंधे यांच्यातर्फे प्रजासत्ताक दिना निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्या मध्ये प्रामुख्याने संविधान गौरव अभियान अंतर्गत सामूहिक संविधान उधे्षिका वाचन तसेच महिलांसाठी विविध स्पर्धा घेऊन भेट वस्तू देण्यात आले.
कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून आपल्या जळगाव शहराचे आमदार सुरेश दामू भोळे (राजुमामा),मा.महापौर तथा सभागृह नेते ललित कोल्हे,दर्जी फाऊंडेशन चे गोपाल दर्जी ,प्रभागाच्या मा.नगरसेविका सिंधुताई कोल्हे मा.महापौर सीमाताई भोळे शिवसेना महिला जिल्हाप्रमुख सौ.सरिताताई माळी-कोल्हे, सौ.ज्योती गोपाल दर्जी, नगरसेविका सौ.लीनाताई पवार,योगिताताई पाचपांडे *शिवसेनेच्या शोभा चौधरी,निशा पवार,ममता जनजाळे व सुषमा चौधरी आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे उदघाटन ललितकोल्हे यांनी केले त्याच प्रमाणे कार्यक्रमात सन्माननीय आमदार श्री.राजुमामा भोळे यांनी कार्यक्रमात अध्यक्षिय मार्गदर्शन करत संविधानाने प्रति आपले कर्तव्य व संविधानाचे वेशिष्ट्या समजावून सांगितले त्याच प्रमाणे श्री ललितभाऊ कोल्हे, गोपाळ दर्जी सर तसेच सरिताताई यांनी मनोगत व्यक्त करून सर्व जमलेल्या नागरिकांना मार्गदर्शन केले त्यानंतर सर्व मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वाटप करण्यात आले..
गोपाल दर्जी यांनी संविधानाचे उद्दे्षिका वाचन करून कार्यक्रम संपन्न केला. कार्यक्रम संपल्या नंतर सर्व परिसरातील महिलांना हळदी कुंकू लावून भेटवस्तू देण्यात आल्या..
कार्यक्रमाचे आयोजन शक्ती फाऊंडेशन चे संस्थापक अध्यक्ष सौ. भारती जि. रंधे यांचे होते तसेच या कार्यक्रमासाठी विवेकानंद नगर परिसरातील श्री.मिलिंद चौधरी, श्गजानन नाना पाटील, शोक पाटील, प्रमोद पाटील, विलास सुतार,सतीश राजपूत, योगेश पाठक,धीरज चौधरी,प्रकाश सोनावणे, किरण दादा, मोनू दादा,सोपान पाटील,ॲड.अभिजीत रंधे, आकाश भंगाळे, मोहित सावडेकर, मयूर देशमुख,सौ. प्रियांका नारखेडे,सौ.सुनंदा सुतार,सौ.नेहा तळेले, सौ.प्रियांका रंधे, सौ.लक्षमी बोराडे, मृणालिनी रंधे यांनी उपस्थित राहून यशस्वी नियोजन केले व प्रमुख मान्यवरांचे स्वागत केले.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम