
शासकीय कार्यालये ग्राहकांची संपत्ती आहे तिचं संरक्षण व स्वच्छता ही ग्राहकांची जबाबदारी – प्रशांत पाटील
शासकीय कार्यालये ग्राहकांची संपत्ती आहे तिचं संरक्षण व स्वच्छता ही ग्राहकांची जबाबदारी – प्रशांत पाटील तहसीलदार
चाळीसगाव:-( प्रतिनिधी)
आज चाळीसगाव पुरवठा प्रशासनाच्या वतीने आयोजित, ग्राहक दिन, या कार्यक्रमात चाळीसगाव येथील तहसीलदार श्री प्रशांत पाटील यांनी आपल्या प्रस्तावना व मनोगतात, ग्राहक जागृती विषयी अनेक महत्त्वाचे मुद्दे मांडले त्याच बरोबर शासकीय कार्यालयांमध्ये येणारा प्रत्येक अभ्यासगत हा पण एक ग्राहकच असतो परंतु शासकीय कार्यालयांची याच अभ्यासगतांनी केलेली अस्वच्छता पाहून मन अगदी खिन्न होते
यावेळी त्यांनी आपल्या मनोगतात सांगितले की शासकीय कार्यालय ही सुद्धा येणाऱ्या प्रत्येक माणसाची संपत्तीच आहे ती संपत्तीचे संरक्षण व स्वच्छता ठेवणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे त्यामुळे या ठिकाणी जे तोंडात तंबाखू ,गुटखा ,पान खाऊन येतात व अनेक ठिकाणी भिंतींवर अस्वच्छतेचे चित्र निर्माण करतात , ती वास्तू किंवा कार्यालय ही स्वच्छ ठेवण्याची आपण ग्राहक व मालक म्हणून आपली जबाबदारी पण आहे आपणास कर्तव्याची जाणीव असते ,परंतु जबाबदारी विसरतो. ग्राहकांने सर्व क्षेत्रात आधी आपली जबाबदारी ओळखून व्यवहार केले तर समोरचा फसवणूक करणारा सुद्धा आपले कर्तव्याचे पालन करीनच! विद्यार्थ्यांना उद्देशून म्हणाले की विद्यार्थी वर्गाने पुढील शैक्षणिक क्षेत्राशी लागणारी दाखले आधीच काढून ठेवली तर ऐनवेळी धावपळ व पैशाचा अपव्यय होत नाही विद्यार्थी वर्गाने ही एक ग्राहक म्हणून जागृत राहिले पाहिजे,अशा शब्दात त्यांनी आपले मनोगत मांडले यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ योगाचार्य व ग्राहक संघटनेचे जिल्हाध्यक्ष वसंतराव चंद्रात्रे, चाळीसगाव तालुका ग्राहक संघटनेचे अध्यक्ष रमेश सोनवणे, चाळीसगाव तालुका पत्रकार मंडळाचे अध्यक्ष श्री आर डी चौधरी,आण्णासाहेब धुमाळ, सर्पमित्र राजेशजी ठोंबरे,नायब तहसीलदार श्री डॉ संदेश निकुंभ, पुरवठा निरीक्षक सौ ज्योत्स्ना हनवटे मॅडम, पुरवठा निरीक्षक सौ मंजुषा देवरे मॅडम, तसेच पुरवठा विभागाचे कर्मचारी उपस्थित होते,
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पुरवठा विभागाचे धिरज देशमुख,भरत पाटील अनिल पाटील नंदकुमार राजपूत यांनी अथक परिश्रम घेतले,

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम