संसदरत्न २०२५ : महाराष्ट्राचे सात खासदार सन्मानित

जळगावच्या खासदार स्मिताताई वाघ यांचा समावेश

बातमी शेअर करा...

संसदरत्न २०२५ : महाराष्ट्राचे सात खासदार सन्मानित

जळगावच्या खासदार स्मिताताई वाघ यांचा समावेश

जळगाव |प्रतिनिधी –  संसदेत सातत्यपूर्ण आणि उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खासदारांना दिला जाणारा संसदरत्न पुरस्कार २०२५ जाहीर झाला असून यंदा महाराष्ट्राच्या सात खासदारांनी बाजी मारली आहे. लोकसभा आणि राज्यसभा सचिवालयाच्या अधिकृत आकडेवारीवर आधारित या पुरस्कारासाठी निवड झालेल्या खासदारांच्या कार्यकौशल्याला मान्यता देण्यात आली आहे.

या पुरस्कारासाठी महाराष्ट्रातील पुढील सात खासदारांची निवड झाली आहे:

सुप्रिया सुळे

श्रीरंग बारणे

अरविंद सावंत

नरेश म्हस्के

स्मिता वाघ

मेधा कुलकर्णी

वर्षा गायकवाड

याशिवाय, राष्ट्रीय स्तरावर भर्तृहरी महताब आणि एन. के. प्रेमचंद्रन यांनाही संसदरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे.

प्राइम पॉइंट फाउंडेशन या संस्थेमार्फत दरवर्षी हे पुरस्कार प्रदान केले जातात. संसदेत उपस्थिती, प्रश्न विचारणे, चर्चेत सहभाग आणि विधेयक मांडणी अशा विविध निकषांच्या आधारे खासदारांची कामगिरी तपासून पुरस्कारांची घोषणा केली जाते.

हा पुरस्कार देशाच्या लोकशाही प्रक्रियेत सक्रिय सहभाग देणाऱ्या लोकप्रतिनिधींना प्रोत्साहन देण्याचा एक सन्माननीय उपक्रम मानला जातो.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम