बातमीदार | रविवार दि. २५ फेब्रुवारी २०२४
स्वखर्चातून बाकडे वाटप – माजी उपमहापौर डॉ.अश्विन सोनवणे यांच्या स्वखर्चातून शहरात बाकडे वाटप मोहीम
2 महिन्यात संपूर्ण शहरातील परिसरात होणार बाकडे वाटप
जळगाव – शहरातील काही परिसरातील मंदिर, चौकात व कट्ट्यांवर बसण्यासाठी व्यवस्था नसल्याने त्या ठिकाणी स्वखर्चातून बाकडे वाटप मोहीम हाती घेणार असल्याची माहिती
माजी उपमहापौर डॉ अश्विन सोनवणे यांनी पत्रकारांशी बोलतांना दिली. तसेच मी लोक प्रतिनिधी नाही तर लोक सेवक असल्याची भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, शहरातील विवध प्रभागांमध्ये मंदिर, चौकात व कट्ट्यांवर बसण्यासाठी नागरिकांना बसण्यासाठी बाकडे नसल्याच्या तक्रारी मनपाचे माजी उपमहापौर डॉ.अश्विन शांताराम सोनवणे यांच्याकडे आल्या होत्या. त्यानुसार त्यांनी स्वखर्चातून बाकडे वाटपाची मोहिम हाती घेतली आहे.
जळगाव शहरातील काही परिसरातील मंदिर व चौकासह येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना बसण्याची व्यवस्था नसल्याच्या तक्रारी मनपाचे माजी उपमहापौर डॉ.अश्विन शांताराम सोनवणे यांच्याकडे प्राप्त झाल्या होत्या,
https://www.facebook.com/share/p/d76tKxxVWKBnogqC/?mibextid=oFDknk
याची दखल घेत त्यांनी शहरातील गणेश कॉलनी सह पिंप्राळा परिसरातील काही भागात बाकडे देण्याची मोहीम हाती घेतली असून आगामी दोन महिन्यात संपूर्ण शहरातील परिसरात
माजी उपमहापौर डॉ.अश्विन शांताराम सोनवणे यांच्या माध्यमातून बाकडे वाटप करण्यात येणार आहेत. अशी माहिती डॉ.अश्विन सोनवणे यांनी दिली आहे. तर ज्याठिकाणी हे बाकडे मिळाले त्या परिसरातील नागरिकांकडून डॉ.अश्विन सोनवणे यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
हे ही वाचा👇
व्हिजन मँन डॉ श्रीकांत शिंदे यांचा वाढदिवस अंबरनाथ युवा सेना पदाधिकाऱ्यांनी केला साजरा
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम