दोन खासदारासह १० आमदार आमच्यासोबत येणार ; शिवसेनेचा दावा !
दै. बातमीदार । १८ फेब्रुवारी २०२३ । केंद्रीय निवडणूक आयोगाने शिंदे गटाला शिवसेना नाव आणि चिन्ह दिले आहे. त्यानंतर राज्यातील शिंदे गटाच्या पदाधिकारीनी प्रत्येक जिल्ह्यात या निर्णयाचे स्वागत केले तर उद्धव ठाकरे यांनी विरोधकावर चांगलीच टीका हि केली होती त्यावर शिवसेना काल निवडणूक आयोगाने आम्हाला दिली असून, एकनाथ शिंदे हे यापक्षाचे प्रमुख आहेत, असे सांगतानाच उरलेले आमदारही आमच्याच चिन्हावर निवडून आले आहेत, ते आमच्यासोबत येणार आहेत, असा दावा खासदार कृपाल तुमाने यांनी केला आहे.
खासदार कृपाल तुमाने म्हणाले की, एकनाथ शिंदे हे आमचे नेतृत्व असून आता बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आम्ही पुढे नेणार आहोत. निवडणूक आयागाने दिलेला निर्णय अपेक्षित होता. यापुढील निर्णय देखील सुप्रीम कोर्टातील निर्णय आम्हाला अपेक्षित आहे. तो ही निर्णय आमच्या बाजूने लागेनच असे त्यांनी म्हटले आहे. आम्हाला विश्वास होता की सर्व गोष्टींचा विचार करून निर्णय होईल. आता बाळासाहेबांच्या प्रेरणेने आम्ही पक्ष पुढे चालवणार आहे. बाळासाहेब ठाकरे यांचे आशीर्वाद आमच्यासोबत आहेत. काँग्रेस- राष्ट्रवादीकडे धनुष्यबाण गहान ठेवला होता. तो आज आमच्याकडे आला आहे. खासदार कृपाल तुमाने म्हणाले की, दसऱ्याच्या वेळेसच दोन्ही खासदार आमच्यासोबत येणार होते. मात्र तेव्हा न आलेले 2 खासदार आणि 10 आमदार हे आमच्यासाबेत तुम्हाला दिसतील. त्यांनी आमच्याच चिंन्हावर निवडणूक लढवली असून ते आमचेच असल्याचा दावा तुमाने यांनी केला आहे.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम