आषाढी एकादशीच्या निमित्ताने शिर्डीत 12 टन खिचडी !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २९ जून २०२३ ।  आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपुरात तर आज विठ्ठल भक्तांचा पूर आला आहेच. यासोबतच राज्यातील विविध मंदिरांमध्ये देखील भाविक विठ्ठल नामाच गरज करताना दिसताय. शिर्डीतील साईबाबांच्या मंदिरातही दरवर्षी प्रमाणे यंदाही भाविकांची मांदियाळी पाहायला मिळतेय. सबका मालिक एक असा संदेश देणाऱ्या साई बाबांच्या दर्शनासाठी भक्तांनी रांगा लावल्या आहेत. शिर्डी हेच माझे पंढरपूर असं म्हणत हजारो साई भक्त हे शिर्डीमध्ये दाखल झाले आहेत. दरम्यान आज आषाढी एकादशीचे निमित्त साई प्रसादालयामध्ये भावाकांसाठी साबुदाणा खिचडीचा महाप्रसाद ठेवण्यात आलाय.

शिर्डीत साईदर्शनासाठी येणारे भाविक आज प्रसादालयात शाबुदाणा खिचडीचा आस्वाद घेत आहेत. आषाढी एकादशीच्या निमित्ताने आज प्रसादालयात तब्बल 12 टनापेक्षा जास्त खिचडी बनवली जातेय. सकाळपासून भाविक प्रसादाचा आनंद घेताहेत. गेल्यावर्षी तब्बल अंशी हजार भाविकांनी खिचडी प्रसादाचा लाभ घेतला होता. यावर्षी देखील तेवढेच भक्त येतील असा अंदाज आहे. यामुळे साईबाबा संस्थानने तशी तयारी ठेवली आहे. कारण शिर्डी पंचक्रोशीतील स्थानिक भाविक हे आजच्या दिवशी आवर्जुन प्रसादाच्या खिचडीचा आस्वाद घेण्यासाठी गर्दी करतात. यासोबतच देशभरातील हजारो भाविकही येथे दर्शनासाठी रांगा लावत असतात.
आषाढी एकादशीच्या निमित्ताने शिर्डीतील साई मंदिरामध्ये देखील विशेष सजावट केली जाते. यासोबतच विठ्ठलाची प्रतिमा ठेवून त्यांचंही पूजन येथे केलं जातं. फुलांच्या सुंदर सजावटीसह तुळशी माळांनी साईंची मुर्ती ही सजवली जात असते. यंदाची आकर्षक सजावत करण्यात आली आहे. कारण भक्त हे आपल्या साईबाबांमध्ये विठ्ठलाला शोधत असतात. यामुळेच शिर्डी माझे पंढरपूर असं म्हणत हजारो साई भक्त आजच्या दिवशी दर्शनासाठी रांगा लावतात. आजही सकाळपासून हजारो भाविकांनी साईबाबांचे दर्शन घेत साबुदाणा खिचडीच्या प्रसादाचा आस्वाद घेतला आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम