‘झुकेंगा नहीं साला’ ; पुष्पा २ ची मोठी अपडेट !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २९ जून २०२३ ।  देशात 2021 वर्षी ज्या वाक्याने वेड लावले होते ते म्हणजे ‘झुकेंगा नहीं साला’. अर्थात पुष्पा या चित्रपटाने. लवकरच या चित्रपटाचा पुढचा भाग म्हणजे पुष्पा 2 प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. अनेक दिवसांपासून प्रेक्षक या सिक्वेलची प्रतीक्षा करत होते. पुष्पा चित्रपटात श्रीवल्लीची भूमिका साकारणारी अभिनेत्री रश्मिका मंदाना हिने याबाबत अपडेट दिली आहे.

पुष्पा: द राइज या दाक्षिणात्य चित्रपटाची कहानी, गाणे, जबरदस्त ॲक्शन आणि कलाकारांचा जीवंत अभिनय यामुळे प्रेक्षकांनी या चित्रपटाला अक्षरश: डोक्यावर घेतले होते. पुष्पा चित्रपटामधील अभिनेत्री रश्मिका मंदाना हिने साकारलेली श्रीवल्ली (Srivalli) आणि तर अभिनेता अल्लू अर्जुनने साकारलेला पुष्पा या भूमिका सर्वांना खूप भावल्या होत्या. पुष्पा 2 मध्ये हीच जोडी दिसणार असून या चित्रपटाच्या चित्रिकरणाला आता सुरुवात झाली आहे. अभिनेत्री रश्मिका मंदाना हिने तिच्या ऑफिशियल इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शुटिंगची स्टोरी पोस्ट केली आहे. तिने या स्टोरीला ‘नाईट शुट’ असे कॅप्शन दिले आहे.

बॉक्स ऑफिस गाजवणारा चित्रपट पुष्पा हा चित्रपट 2021 च्या डिसेंबरमध्ये रिलिज झाला होता. या चित्रपटाने सुमारे 300 कोटींचा गल्ला कमावला होता. चित्रपटातील गाणी खूप गाजली होती. आता याच चित्रपटाचा सिक्विल पुष्पा 2: द रुल याचे शुटिंग सुरु झाले आहे. या चित्रपटासाठी 400 कोटींचे बजेट आहे. या बिग बजेट चित्रपट प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आणि निर्मात्यांनाही दुसऱ्या भागाकडून कमाईची जास्त अपेक्षा आहे. यामध्ये प्रमुख भूमिकेत अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना झळकणार आहे. हा चित्रपट पुढच्या वर्षी म्हणजे 2024 साली प्रदर्शित करण्यात येणार आहे. चित्रपटातील कथेत बदल करण्यात आल्याने चित्रिकरणाला विलंब होत आहे. अभिनेत्री रश्मिका मंदाना ही यशाच्या शिखरावर असून तिने आता फक्त दाक्षिणात्यच नाही तर बॉलीवुडमध्येही आपले स्थान निर्माण करण्यास सुरुवात केली आहे. तिने बिग बी अमिताभ बच्चन यांच्या सोबत ‘गुडबाय’ या चित्रपटातून बॉलीवुडमध्ये एन्ट्री केली. आता ती लवकरच ॲनिमल या चित्रपटात झळकणार आहे. यामध्ये ती अभिनेता रणबीर कपूर सोबत स्क्रिन शेअर करणार आहे. तसेच ती पुष्पा: द रुल या चित्रपटाच्याही तयारीत आहे. रश्मिकाचे चाहते तिच्या आगामी हिट चित्रपटांसाठी उत्सुक आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम