सिक्कीमच्या पुरात १४ जणांचा मृत्यू तर शेकडो नागरिक बेपत्ता

बातमी शेअर करा...

बातमीदार | ५ ऑक्टोबर २०२३

सिक्कीममध्ये ढगफुटी आणि त्यानंतर अचानक आलेल्या पुरामुळे राज्यात मोठी हानी झाली आहे. त्यामुळे एका जलविद्युत प्रकल्पाचा मोठा भाग वाहून गेला असून अनेक लोक बेपत्ता झाले आहेत. याठिकाणी असलेल्या लोनाक सरोवराचा परिसरात ढगफुटीसदृष पावसामुळे मोठं नैसर्गिक संकट निर्माण झालं.

ढगफुटीमुळे लोनाक सरोवराचे पाणी ओव्हरफ्लो होऊन वाहू लागले. त्यामुळे तीस्ता नदीला अचानक महापूर आला. या पुराची तीव्रताही जास्त होती. या नैसर्गिक आपत्तीचे काही सॅटलाईट फोटो इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशनने जारी केले आहेत. सिक्कीम सरकारने दिलेल्या माहितीनुसार, अचानक आलेल्या पुरामुळे 14 लोकांचा मृत्यू झाला आहे, तर 102 लोक बेपत्ता झाले आहेत. बेपत्ता नागरिकांनामध्ये 23

सैनिकांचाही समावेश आहे. याशिवाय 26 जण जखमी झाले आहेत. बेपत्ता नागरिकांचा शोध सुरू आहे. भारतीय लष्कर आणि प्रशासनाने बचावकार्य आणि शोधमोहिम सुरु केली आहे.
इस्रोच्या टेम्पोरल सॅटेलाइट हे फोटो जारी केले आहेत. 17 सप्टेंबर आणि 28 सप्टेंबर रोजी घेतलेल्या छायाचित्रांमध्ये तलावाची स्थिती दाखवण्यात आली आहे. बुधवारी 4 ऑक्टोबर सकाळी सहा वाजता काढलेले चित्र पाहता तलावाचा आकार निम्म्यावर आल्याचे दिसून येत आहे. 100 हेक्‍टरहून अधिक क्षेत्रावर पसरलेले पाणी वाया गेले असून आता केवळ 60.3 हेक्‍टर क्षेत्रावरच पाणी उपलब्ध आहे. इस्रोने सांगितले की, 17, 18 सप्टेंबर आणि 4 ऑक्टोबर रोजी तलावाच्या क्षेत्रात बदल झाले आहेत. ढगफुटीमुळे तलावातील 105 हेक्टर पाणी वाहून गेल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे अचानक पूर आला. या स्थितीवर आम्ही यापुढेही लक्ष ठेवणार आहोत, असं इस्रोने म्हटलं आहे.

 

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम