मोठी बातमी : नांदेड मृत्यूप्रकरणी अधिष्ठात्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

बातमी शेअर करा...

बातमीदार | ५ ऑक्टोबर २०२३ 

राज्यातील नांदेड येथे रुग्णालयामध्ये 24 तासांमध्ये 24 रुग्णांचा मृत्यू झाल्याची समोर आल्यानंतर सर्वच विरोधकांनी सत्ताधाऱ्यावर जोरदार टीका केली होती. आता त्यात मोठी अपडेट समोर आली आहे. शासकीय रूग्णालयातील मृत्यूचा मुद्दा सूरू असतानाच डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता (डीन) डॉ. एस.आर. वाकोडे यांच्यासह बालरोग विभागातील डॉक्टरवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन दिवसांपूर्वी या रुग्णालयामध्ये 24 तासांमध्ये 24 रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली होती. या मृतांमध्ये 12 बालकांचा समावेश होता.

दरम्यान, बालकासह मातेचाही मृत्यू झाल्याची घटना समोर आली होती. तर, नांदेडच्या कंधार तालुक्यातील कुरुळा येथील मायलेकाच्या मृत्यू प्रकरणामध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. कामाजी टोम्पे यांनी नांदेड ग्रामीण पोलिस ठाण्यात या संबधित तक्रार दाखल केली आहे. त्यांचे नातेवाईक रुग्णालयात भरती असताना त्यांना बाहेरुन ४० हजारांहून अधिकची औषध खरेदी करण्यास सांगितलं. रक्त व इतर तपासण्यासाठीही देखील पैसे खर्च करावे लागले. अधिष्ठाता डॉ. एस.आर. वाकोडे आणि बालरोग विभागातील डॉक्टर यांनी उपचाराकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचेही त्यांनी आपल्या तक्रारीत म्हटलं आहे.

नांदेडमधील शासकीय रुग्णालयामध्ये 22 वर्षीय अंजली वाघमारे या महिलेला प्रसूतीसाठी दाखल करण्यात आलेले होते. शनिवारी सायंकाळी तिची प्रसूती झाली. तिने मुलीला जन्म दिला. मात्र, शनिवारीच नवजात बाळाचा मृत्यू झाला. त्यांनतर, महिलेची देखील प्रकृती बिघडत गेली आणि तिचाही मृत्यू झाला. महिलेचाही मृत्यू झाल्यानं मोठी खळबळ उडाली. त्यामुळे महिलेचे नातेवाईक असलेल्या कामाजी टोम्पे यांनी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यांच्या तक्रारीवरुन नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये बुधवारी रात्री शासकीय रुग्णालयाचे अधिष्ठाता एस आर वाकोडे आणि बालरोग विभागातील डॉक्टरांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम