निसर्गाच्या तांडवामुळे २३ जण मृत्यूच्या कुशीत!

advt office
बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २० सप्टेंबर २०२२ । गेल्या काही दिवसांत राज्यासह देशभरातील विविध भागात पावसाच्या जोरदार सरी थैमान घालत असल्याने, सातत्याने सुरू असणाऱ्या या पावसामुळे वीज कडाडून मोठ्या दुर्घटनाही घडत आहेत. अशाच एका घटनेत एक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल २३ नागरिकांनी आपला जीव गमावला आहे.

बिहारच्या विविध जिल्ह्यांमध्ये सोमवारी सायंकाळी विजांच्या कडकडाट व वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. यामुळे वीज पडून तब्बल २३ जणांचा मृत्यू झाला असून, या घटनेत ८ मुलांसह अनेकजण गंभीर जखमीही झाले आहेत. तसेच अररिया आणि पूर्णियामध्ये चार तर सुपौलमध्ये तीन व सहरसा, बांका आणि जमुईमध्ये प्रत्येकी दोन जणांचा मृत्यू झाला आहे.

रोहतास जिल्ह्यातील देहरी उपविभागातील अकोडीगोला येथील धरहरा येथे जुन्या शिवमंदिराच्या घुमटावर अचानक वादळ आले. या घटनेत मंदिराच्या कळसावर भेगा पडल्या नाहीत, मात्र मंदिराच्या कळसातून धुराचे लोट निघू लागल्याने तिथे असंख्य नागरिकांची गर्दी जमली. निसर्गाच्या या तांडवामुळे मंदिराचे भले मोठे नुकसान झाले आहे.

दरम्यान, काही नागरिकांनी या घटनेचे मोबाईलमध्ये चित्रीकरण केले आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम