पनवेलमधून पीएफआयच्या सचिवासह ३ कार्यकर्त्यांना ताब्यात

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २० ऑक्टोबर २०२२ ।  गेल्या महिन्याभरापासून राज्यातील विविध ठिकाणी पीएफआयच्या कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली असून हि कारवाई आता राज्यातील एटीएसने पनवेलमधून पीएफआयच्या ४ कार्यकर्त्यांना अटक केली आहे. यात पीएफआयच्या सचिवाचाही समावेश आहे. पीएफआय संघटनेच्या बॅनरखाली चौघे सभा घेत असल्याचे आढळून आले आहे. त्यानुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पनवेलमध्ये रात्री उशिरा कारवाई करत एटीएस पथकाने चौघांना ताब्यात घेतले आहे.

केंद्र सरकारने पीएफआय म्हणजेच पॉप्यलर फ्रंट ऑफ इंडिया संघटनेवर बंदी घातली आहे. बंदी घातल्यानंतरही पीएफआय आपल्या संघटनेला पुढे नेण्याचा प्रयत्न करण्याच्या आरोपाखाली या पीआयएफ कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आहे.
याआधी महाराष्ट्र एटीएस आणि एनआयएने पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया संघटनेच्या सदस्यांवर केलेल्या कारवाईत महत्त्वाचे धागेदोरे समोर आले. औरंगाबाद हे पीएफआयचे महत्त्वाचे केंद्र असल्याचे समोर आले आहे. महाराष्ट्र एटीएसला औरंगाबादमधून अटक केलेल्या सदस्यांकडून महत्त्वाची माहिती मिळाली आहे. मराठवाड्यात शारिरीक प्रशिक्षणाच्या नावाखाली दहशतवादाचे प्रशिक्षण दिले जात असल्याचे एटीएसच्या तपासात समोर आले आहे.

महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि गोवा राज्यांचा समन्वयक म्हणून काम पाहणाऱ्या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या (पीएफआय) समन्वयकाला मध्य प्रदेश दहशतवाद प्रतिबंधक (एटीएस) पथकाने औरंगाबादेतून अटक केली. औरंगाबादेतील इंदिरानगर येथील रहिवासी असलेल्या नासिर नदवी याच्याकडे केंद्रीय समितीमधील बड्या नेत्यांमध्ये समन्वय करण्याचे काम होते. त्याचप्रमाणे या तीन राज्यांसह इतर राज्यातील कोणत्या आणि किती सदस्यांना प्रशिक्षण द्यायचे हे ठरवण्याचेही काम होते. अटक केलेल्या पीएफआय सदस्यांविरोधात नाशिक सत्र न्यायालयात सध्या सुनावणी सुरू आहे. या सुनावणीत सरकारी वकिलांनी अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. एटीएसच्या तपासामध्ये ‘पीएफआय’ला अयोध्येत उभारले जात असलेले राम मंदिर पाडून पुन्हा बाबरी मशीद उभारायची होती. 2047 पर्यंत पीएफआयला भारताला मुस्लीम राष्ट्र बनवण्याचा प्लॅन होता, अशी माहिती समोर आल्याचे सरकारी वकिलांनी सांगितले आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम