प्रवाशीला १५ मिनिटे गाडीत फिरण्याचे भाडे लागले 32 लाख रुपये

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ११ ऑक्टोबर २०२२ । जिथे एका व्यक्तीला १५ मिनिटे प्रवास करणे चांगलेच महागात पडले. तुम्हाला माहितेय का Uber नं प्रवास करणाऱ्या त्या व्यक्तीचे 100, 200 किंवा 500 नव्हे तर 32 लाख रुपयांचं बिल झालं. त्यानं कधी स्वप्नातही विचार केला नसेल. सोशल मीडियावर अनेकदा ॲप-आधारित कॅब सर्विसमधील चुकीच्या बिलांची प्रकरणे समोर येतात. नुकतेच असेच एक प्रकरण समोर आले आहे.

तुम्हीही ॲप आधारित कॅब सेवा वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. न्यूयॉर्क पोस्टच्या वृत्तानुसार, त्या व्यक्तीने जेव्हा त्याचे बँक खाते तपासले तेव्हा त्याच्या पायाखालची जमीन सरकली होती कारण Uber नं त्याला केवळ 15 मिनिटांच्या प्रवासासाठी चक्क $39,317 (सुमारे 32 लाख रुपये) रुपये घेतले. यूकेमध्ये (UK) राहणाऱ्या 22 वर्षीय ऑलिव्हर कॅप्लाननं काही दिवसांपूर्वी ऑफिसमधून मित्रांकडे जाण्यासाठी उबेर कॅब बुक केली होती. त्यांच्या ऑफिसपासून त्या ठिकाणचे अंतर जेमतेम 15 मिनिटांचे होते. यादरम्यान तो कॅबमध्ये बसून आपल्या मित्रांकडे जाण्यासाठी निघाला. आल्यानंतर त्याने ऑनलाइन बिल भरलं. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर जेव्हा त्याने क्रेडिट कार्डचे बिल तपासलं तेव्हा त्याची जाग उडाली होती.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम