डॉ.शशी थरूर हेच काँग्रेस अध्यक्षपदासाठी एकमेव पर्याय ; काँग्रेसजनांना खुले पत्र

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ११ ऑक्टोबर २०२२ । अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचा अध्यक्ष लोकशाही पद्धतीने निवडण्यात यावा, यासाठी श्रीमती सोनिया गांधी व राहुल गांधी यांनी सहमती दर्शविली. गांधी कुटुंब या पारदर्शी निवडणूकीपासून अलिप्त राहणार असून तब्बल २४ वर्षांनी गांधी कुटुंबाबाहेरील व्यक्ती काँग्रेसच्या अध्यक्षपदी विराजमान होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे, ही स्वागतार्ह बाब आहे. पक्षात विकेंद्रीकरणासाठी हे महत्वाचे पाऊल असून काँग्रसचे भविष्य उज्ज्वल आहे असे देशमुख यांनी पत्रात म्हटले आहे. काँग्रेस अध्यक्षपदासाठी डॉ. शशी थरूर यांना पाठींबा मिळावा यासाठी माजी आमदार आशिष देशमुख यांनी मोहीम हाती घेतली असून त्यासाठी काँग्रेसजनांना खुले पत्र लिहिले आहे.

BJP add

राज्यसभेतील विरोधी पक्ष नेते मल्लिकार्जुन खर्गे आणि ‘जी-23’ गटाचे खासदार डॉ. शशी थरूर यांच्यात सरळ लढत होणार आहे. थरूर उच्चशिक्षित व अभ्यासू खासदार आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांचे काम आहे. 30 सप्टेंबरला नवी दिल्ली येथे डॉ. शशी थरूर यांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी नामांकन भरले, त्यांच्या समर्थनार्थ त्यावेळी मी त्यांच्यासोबत होतो. 12 राज्यांतील काँग्रेस समर्थकांनी त्यांना खुले समर्थन दिले आहे.

येणाऱ्या 17 ऑक्टोबरला त्यांचा काँग्रेस अध्यक्षपदाचा विजय निश्चित व्हावा, अशी सामान्य कार्यकर्त्यांची ईच्छा आहे. डॉ. शशी थरूर यांचे पक्षातील सर्वांशी सलोख्याचे संबध आहेत. पक्षाला नवी दिशा दाखविण्याची क्षमता त्यांच्यामध्ये आहे. त्यानिमित्ताने, पक्षाला नव्या ताकदीने पुढे नेऊन देशात काँग्रेसला सत्तेत आणण्याची जबाबदारी ते समर्थपणे सांभाळू शकतील, असा विश्वास देशमुख यांनी व्यक्त केला आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम