धरणगाव नगरपरिषद कर्मचाऱ्यांचे थकीत वेतनासंदर्भात निषेध

बातमी शेअर करा...

धरणगाव नगरपरिषद कर्मचाऱ्यांचे थकीत वेतनासंदर्भात निषेध

मंगळवारपासून काळ्या फिती लावून काम 

धरणगाव (प्रतिनिधी) : धरणगाव नगरपरिषदेतील कर्मचाऱ्यांचे मार्च आणि एप्रिल २०२५ चे वेतन तसेच निवृत्तीवेतन अद्याप थकीत असल्यामुळे भारतीय कर्मचारी महासंघाच्या वतीने १३ मे मंगळवारपासून आंदोलनात्मक पद्धतीने काळ्या फिती लावून काम करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

या संदर्भात महासंघाच्या वतीने धरणगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक यांना निवेदन सादर करण्यात आले. निवेदनात कर्मचाऱ्यांना वेतन थकीत असल्यामुळे निर्माण झालेल्या आर्थिक अडचणींचा उल्लेख करण्यात आला आहे. गृहकर्जाचे हप्ते, बँका व पतसंस्थांचे कर्जफेड, आजारपणावरील खर्च तसेच लग्नसराईच्या काळातील गरजा पूर्ण करण्यात कर्मचाऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे, असे नमूद करण्यात आले आहे.

या निवेदनाची तात्काळ दखल घेऊन थकीत वेतन व निवृत्तीवेतन लवकरात लवकर अदा करण्यात यावे, अशी मागणी भारतीय कर्मचारी महासंघाचे सरचिटणीस अॅड. हरिहर पाटील यांनी केली आहे.

या आंदोलनामुळे नगरपालिकेतील प्रशासकीय कामकाजावर काही प्रमाणात परिणाम होण्याची शक्यता असून प्रशासनाने तातडीने निर्णय घेणे गरजेचे आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम