राज्यात २४ तासात आढळले ३४३ कोरोनाचे रुग्ण !

advt office
बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २५ मार्च २०२३ । देशात आता पुन्हा एकदा कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होऊ लागली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, आज देशात कोरोनाच्या 1700 पेक्षा जास्त रूग्णांची नोंद झाली आहे. भारतात सक्रिय रूग्णांची संख्या आता 7927 वर पोहोचली आहे.

आरोग्य मंत्रालयाने शनिवारी दिलेल्या माहिती नुसार आत्ता पर्यंत एकूण मृतांची संख्या 530818 झाली असून मृत्यूचा दर 1.19 टक्के नोंदवला गेला आहे. दरम्यान राज्यात मागील 24 तासात 343 रुग्ण आढळून आले आहेत.सर्वाधिक रुग्ण हे पुणे शहरातील असून पुण्यात 510 रुग्णांची नोंद झाली असून नवे 136 रूग्ण आढळले आहेत. राज्यात तीन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आज एकूण 1700 सक्रिय रुग्ण आढळले आहेत. तर देशात आत्ता पर्यंत 98.79 टक्के लोक कोरोनामधून बरे झाले आहेत. या आजारातून बरे होणाऱ्यांची संख्या 44156345 वर पोहोचली आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या वेबसाइटनुसार, देशव्यापी राबवलेल्या कोरोना लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत जवळपास 220.65 कोटी डोस देण्यात आले आहेत. केंद्राने काही राज्यांमध्ये कोरोना पॉझिटिव्ह दरात वाढ होत असल्याबद्दल चिंता व्यक्त केली आणि त्यावर तातडीने नियंत्रण ठेवण्याची गरज असल्याचे सांगितले असून प्रशासनाला सतर्क राहण्यास सांगण्यात आले आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम