सकाळी ब्रश न करता पाणी पिणे घातक कि फायदेशीर ?

advt office
बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २५ मार्च २०२३ । प्रत्येक व्यक्ती आपल्या आरोग्याची काळजी व्यवस्थित नेहमी घेत असतो त्यासोबत सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी पाणी प्या असे तुम्ही अनेकदा तुमच्या घरी, मित्र मैत्रिणींकडून ऐकले असेल. पण, आपण रिकाम्या पोटी पाणी का प्यावे? यामागील सत्य जाणून घेण्याचा कधी प्रयत्न केला आहे का? आज आम्ही तुम्हाला याच संदर्भात अधिक माहिती सांगणार आहोत की रिकाम्या पोटी, ब्रश न करता पाणी प्यावे की पिऊ नये. या बाबतीत संशोधनात नेमकं काय म्हटलं आहे.

खरंतर, पाणी प्यायल्याने आपले शरीर दिवसभर हायड्रेट राहते. याबरोबरच पोटही चांगले राहते आणि तुमची त्वचाही दिवसभर तजेलदार राहते. डॉक्टरांच्या मते, दिवसभरात 10-12 ग्लास पाणी प्यावे. ब्रश न करताही हे फायदेशीर आहे, असे अनेकांचे मत आहे. या प्रश्नावर संशोधन काय सांगतं हे आज आपण जाणून घेणार आहोत. ब्रश न करता पाणी पिणे कितपत शरीरासाठी फायदेशीर आहे, संशोधनात काय म्हटलंय?

तोंडातील बॅक्टेरिया नष्ट होतात ब्रश न करता पाणी प्यायल्याने आपली पचनशक्ती वाढते असे अनेकजण सांगतात. याशिवाय तोंडात आढळणारे बॅक्टेरियाही जमा होण्यापूर्वीच नष्ट होतात. त्यामुळे पाणी पिणे गरजेचे आहे.
प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते
सकाळी दात न घासता पाणी प्यायल्याने तुमची रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि अनेक आजारांपासूनही तुमचा बचाव होतो. विशेषत: हिवाळ्यात, जर तुमच्यामध्ये खोकला, सर्दी आणि हंगामी आजारांची लक्षणे दिसत असतील तर तुम्ही एक ग्लास कोमट पाणी प्यावे. ब्रश न करता पाणी पिल्याने त्याचा त्वचेवर आणि केसांवर चांगला परिणाम होतो.
तजेलदार त्वचा राहण्यास मदत होते
तजेलदार त्वचेसाठी तुम्ही ब्रश न करता रिकाम्या पोटी पाणी नक्कीच प्यावे. यामुळे तुमची त्वचा दिवसभर तजेलदार राहते. यासोबतच तोंडात फोड येणे, आंबट ढेकर येणे, बद्धकोष्ठता अशा पोटाशी संबंधित सर्व समस्याही दूर होतात.
मधुमेहाचा धोका कमी होतो
उच्च रक्तदाब आणि मधुमेह असलेल्यांनी ब्रश न करता सकाळी रिकाम्या पोटी पाणी प्यावे. यामुळे तुमची मधुमेहाशी संबंधित असणारी समस्या दूर होण्यास मदत होते.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम