अपघातात मृत झालेल्यांच्या परिवाराला ५ लाखांची मदत !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १ जुलै २०२३ ।  राज्यातील समृद्धी महामार्गावर बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा खासगी बसचा भीषण अपघात झाला. या अपघातानंतर बसला लागलेल्या आगीत २६ जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. झालेली घटना अत्यंत दुर्दैवी असून या शोकाकूल प्रसंगी राज्य सरकार जखमी व मृतांच्या कुटुंबीयासोबत आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यंमत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. तसेच, मृताच्या नातेवाईकांना तत्काळ ५ लाखांची मदत व जखमींच्या उपचाराचा संपूर्ण खर्च राज्य सरकार करणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

दरम्यान, आजच्या भीषण दुर्घटनेनंतर समृध्दी महामार्गावरील वाहनांच्या आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा प्रकर्षाने ऐरणीवर आला आहे. अशा अपघातांची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून राज्य शासनाने तज्ञांच्या सल्ल्याने यावर तात्काळ उपाययोजना करावी, अशी मागणी राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली आहे. तर, राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुप्रिया सुळे यांनी खासगी बसच्या वेगावरील कायदेशीर नियंत्रणाचा मुद्दा उपस्थित केला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, अपघात अत्यंत दुर्दैवी आहे. सध्या जखमींच्या उपचारावर अधिक लक्ष द्यावे, अशा सूचना प्रशासनाला केल्या आहेत. जखमी पूर्ण बरे होईपर्यंत राज्य सरकार त्यांची काळजी घेईल. त्यांच्या उपचाराचा संपूर्ण खर्च केला जाईल. तर, शासनाची जबाबदारी म्हणून मृताच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत केली जाईल. अपघात का झाला? त्यामागे काय कारणे होती? अपघात कसे रोखता येईल? याची संपूर्ण चौकशी करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम