५० बहिणींना ‘हवाईसफर’ देवून दिली भाऊबीज भेट !
अंबरनाथचे नगराध्यक्ष सुनील चौधरींचे जिल्ह्यात होत आहे कौतुक
बातमीदार | १७ नोव्हेबर २०२३
राज्यभर दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी भाऊबीज सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत असतो. अनेक भाऊ आपल्या बहिणीला भाऊबीज निमित्त आपल्या परीने छोटे मोठे गिफ्ट देत असतात, पण जळगाव जिल्ह्यातील एका भावाने चक्क आपल्या गावातील ५० बहिणींना भाऊबीज निमित्त विमानाने हवाईसफर केल्याने या घटनेची जिल्ह्यात मोठी चर्चा सुरु झाली आहे.
जळगाव तालुक्यातील आव्हाणे येथील रहिवासी असलेले व सध्या अंबरनाथचे नगराध्यक्ष सुनील चौधरी असे त्या भावाचे नाव असून त्यांनी आपल्या गावातील तब्बल ५० बहिणींना भाऊबीजनिमित्त जळगाव ते अंबरनाथ अशी हवाईसफर करून जणू काही गिफ्टच दिले आहे. या खास भाऊबिजेचे आव्हाने गावासह जिल्ह्यात मोठी चर्चा सुरु झाली असून या भावाचे अनेकांनी कौतुक देखील केली आहे. आज देखील या भावाने आपल्या गावाशी असलेली नाळ जुळवून ठेवल्याचे देखील आठवणी ताज्या होवू लागल्या आहे.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम