नवरात्रीच्या पहिल्याच माळेला ५० हजार भाविकांनी घेतले दर्शन !

बातमी शेअर करा...

बातमीदार | १६ ऑक्टोबर २०२३

राज्यातील साडेतीन शक्तिपीठांपैकी अर्ध शक्तिपीठाचा महिमा असलेल्या स्वयंभू श्री सप्तशृंगी देवीचा शारदीय नवरात्रोत्सव रविवार दि. १५ पासून सुरू झाला आहे. नवरात्रीच्या पहिल्याच माळेला ४० ते ५० हजार भाविकांनी भगवतीचे दर्शन घेतले.

नवरात्रोत्सवाच्या दृष्टीने ट्रस्टच्या मुख्य कार्यालयात श्री भगवतीच्या अलंकारांचे विधिवत पूजन श्री सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्टचे अध्यक्ष तथा जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश बाळासाहेब वाघ यांनी केले. त्यानंतर ट्रस्टच्या मुख्य कार्यालयापासून अलंकारांची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. या प्रसंगी अनेक भाविक उपस्थित होते.
आजची पंचामृत महापूजा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीचंद डी. जगमलानी यांनी केली. नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांनी संकल्प आरती केली. यावेळी मान्यवरांच्या हस्ते श्री भगवती मंदिरात घटस्थापना करण्यात आली. यावेळी श्री सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्टचे अध्यक्ष तथा जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश बाळासाहेब वाघ, विश्वस्त तथा तहसीलदार रोहिदास वारुळे, विश्वस्त ललित निकम, दीपक पाटोदकर, मनज्योत पाटील, डॉ. प्रशांत देवरे, भूषणराज तळकेर, व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे, कार्यकारी अधिकारी भगवान नेरकर, कार्यालयीन अधीक्षक प्रकाश जोशी, जनसंपर्क अधिकारी भिकन वाबळे उपस्थित होते.

पहिल्या माळेला पोलिसांनी भाविकांच्या दृष्टीने योग्य पद्धतीने बंदोबस्त हाताळला. पोलीस निरीक्षक घगेंद्र टेंभेकर यांच्या नेतृत्वाखाली कळवणसह जिल्ह्यातील पोलिसांनी गडावर गर्दीचे व वाहनांचे नियोजन केले. गडावर खासगी वाहतूक बंद करण्यात आली असून, स्थानिक व्यावसायिकांची गैरसोय होऊ नये, म्हणून पासेसची व्यवस्था तहसीलदार रोहिदास वारुळे यांनी देवस्थान ट्रस्टच्या माध्यमातून करून दिले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम