ज्या देशांना हवी त्या देशांना 5G सेवा पुरविणार ; अर्थमंत्री सीतारामण

advt office
बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १४ ऑक्टोबर २०२२ ।  4G सेवा आल्यानंतर काही वर्षातच देशात 5G सेवा अर्थात अत्याधुनिक तंत्रज्ञान भारतात नुकतीच लॉन्च झाली. ही सेवा संपूर्ण स्वदेशी असून ज्या देशांना ती हवी असेल त्यांना आपण पुरवू शकतो, असं विधान अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी म्हटलं आहे.

अमेरिकेतल्या वॉशिंग्टन इथल्या जॉन्स पॉपकिन्स स्कूल ऑफ अॅडव्हान्स इंटरनॅशनल स्टडीजच्या विद्यार्थ्यांशी गुरुवारी बोलताना त्यांनी हे सूचक विधान केलं. सीतारामण म्हणाल्या, भारतानं लॉन्च केलेल्या 5G तंत्रज्ञानासाठी काही भाग दक्षिण कोरियातून मागवण्यात आले आहेत, परंतू हे तंत्रज्ञान पूर्णतः स्वदेशी आहे. टेलिकॉम क्षेत्रात क्रांती करणारं हे स्वदेशी तंत्रज्ञान ज्या देशांना हवं असेल त्यांना आपण पुरवू शकतो.

देशभरात 2024 पर्यंतलागू होणार सेवा
भारतात 5G तंत्रज्ञान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते १ ऑक्टोबर रोजी लॉन्च करण्यात आलं होतं. सुरुवातीला देशातील काही निवडक मेट्रो शहरांमध्येच ही सेवा उपलब्ध असणार आहे. त्यानंतर सन २०२४ पर्यंत ही सेवा संपूर्ण देशभरात लागू होणार आहे. आपल्या देशात लॉन्च झालेलं हे तंत्रज्ञान इतर देशांतून आयात केलेलं नाही ते संपूर्ण स्वदेशी आहे. त्यामुळं भारतीयांना या कामगिरीसाठी अभिमान वाटला पाहिजे, असंही यावेळी सीतारामण यांनी म्हटलं.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम