माझ्या भावाचा अपमान मला नाही चालत : सुषमा अंधारेंनी मुख्यमंत्र्यांना डीवचल

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १४ ऑक्टोबर २०२२ ।  शिंदे गट शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर ठाकरे गटात गेलेल्या सुषमा अंधारे यांनी गुरुवारी नवी मुंबईमधील महाप्रोधन यात्रेदरम्यान झालेल्या कार्यक्रमामधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर शेलक्या शब्दांमध्ये टीका केली. आपल्या भाषणांमुळे मागील काही काळामध्ये लोकप्रिय झालेल्या अंधारे यांनी मुख्यमंत्री शिंदेंना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत दिलेल्या चिठ्ठीच्या प्रकरणावरुन चांगलीच शाब्दिक फटकेबाजी केल्याचं पहायला मिळालं.

“काय काय बोलतील पत्ताच लागत नाही. आम्ही आमच्या आयुष्यात असं कधी पाहिलं नाही. काय काय पाहायला मिळतंय आम्हाला आज. माझा भाऊ मुख्यमंत्री आहे. मला वाईट वाटतं आहो. मला नाही चालत माझ्या भावाचा असा अपमान केलेलं. वाईट वाटतं मला. माझ्या भावाच्या समोरचा माईक ते काढून घेतात,” असं आपल्या भाषणात म्हटलं. त्यांचं हे विधान ऐकून सभागृहामध्ये उपस्थित असणारे सारेच हसू लागले. “बोलायला लागले की कागद देतात. का माझ्या भावाला येत नाही काही? माझा भाऊ ढ वाटतो का तुम्हाला? माझा भाऊ कॉप्या करुन पास झालाय का?” असा उपहासात्मक प्रश्न अंधारे यांनी विचारला.

“हुशार आहे माझा भाऊ. विद्वान आहे माझा भाऊ. का कागद देताय तुम्ही त्यांना? का कॉप्या पुरवताय?” असा प्रश्न अंधारे यांनी अप्रत्यक्षपणे भाजपाला आणि पर्यायाने उपमुख्यमंत्री फडणवीस यांनाकेला. “गिरीश महाजनांनी कागद धरुन सांगायचं. हे अजिबात बरोबर नाही अध्यक्ष महोदय हे आम्हाला पटलेलं नाही,” असं म्हणत अंधारे यांनी खोचक शब्दांमध्ये टीका केली.

 

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम