नेपाळमध्ये रात्रीच्या सुमारास 6.4 रिश्टर स्केलचा भूकंप !

बातमी शेअर करा...

बातमीदार | ४ नोव्हेबर २०२३

नेपाळमध्ये शुक्रवारी रात्री 11.32 वाजता 6.4 रिश्टर स्केलचा भूकंप झाला. त्याचे केंद्र नेपाळमधील काठमांडूच्या वायव्येस 331 किलोमीटर अंतरावर 10 किलोमीटर भूमिगत होते. नेपाळमधील दोन जिल्हे सर्वाधिक प्रभावित झाले आहेत.

जाजरकोटमधील स्थानिक अधिकाऱ्याने ‘रॉयटर्स’ वृत्तसंस्थेला सांगितलं की, जिल्ह्यात किमान ३४ लोकांचा मृत्यू झाला आहे. तर शेजारच्या रुकुम पश्चिम जिल्ह्यात किमान ३६ लोक मृत पावल्याची माहिती समजत आहे. या दुर्घटनेनंतर देशातील तिन्ही सुरक्षा यंत्रणा जखमींना तत्काळ मदत करण्यासाठी घटनास्थळी रवाना झाल्या आहेत, याबाबतची माहिती नेपाळच्या पंतप्रधान कार्यालयातून देण्यात आली आहे.

नेपाळच्या गृहमंत्रालयाने सांगितलं की, दैलेख, सल्याण आणि रोल्पा जिल्ह्यांसह इतरही काही जिल्ह्यांतून लोक जखमी झाल्याची आणि मालमत्तेचं मोठं नुकसान झाल्याच्या बातम्या समोर येत आहेत. जखमींवर जाजरकोट जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जाजरकोट हे काठमांडूपासून पश्चिमेला सुमारे ५०० किलोमीटर अंतरावर आहे. विशेष म्हणजे गेल्या महिन्यात ३ ऑक्टोबर रोजी, नेपाळमध्ये ६.२ रिश्टर स्केलच्या तीव्रतेच्या भूकंपाचे धक्के जाणवले होते. भारताची राजधानी दिल्लीसह उत्तर भारतातील काही भागांमध्येही भूकंपाचे धक्के बसले होते.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम