दिवाळी सणाच्या तोंडावर लालपरी महागली !

बातमी शेअर करा...

बातमीदार | ४ नोव्हेबर २०२३

येत्या चार ते पाच दिवसावर दिवाळी सण येऊन ठेपला असतांना चाकरमान्यांची गावी अथवा पर्यटनस्थळी जाण्याची लगबग सुरू झाली आहे. याच पार्श्वभूमीवर दरवर्षीप्रमाणे महसूल वाढीच्या दृष्टीने परिवर्तनशील हंगामी भाडेवाढ सूत्रानुसार, एसटीने या दिवाळीच्या हंगामात आपल्या सर्व बस प्रकारच्या तिकीट दरात सरसकट १० टक्के भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. ही भाडेवाढ ७ नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपासून म्हणजे ८ नोव्हेंबर ते २७ नोव्हेंबरदरम्यान लागू राहणार आहे. ८ नोव्हेंबरपासून सर्वत्र दिवाळी सुरू होत आहे. या दिवाळी सुट्ट्यांनिमित्त चाकरमानी आपल्या मूळ गावी अथवा पर्यटन स्थळी जाण्यासाठी नियोजन करतात. रेल्वे प्रशासनाकडून दिवाळीनिमित्त जादा गाड्या सोडण्यात येत असताना एसटी महामंडळाकडून देखील दिवाळीनिमित्त जावा गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे.

अशातच दरवर्षीप्रमाणे महसूल वाढीच्या दृष्टीने परिवर्तनशील हंगामी भाडेवाढ सूत्रानुसार, एसटीने या दिवाळीच्या हंगामात आपल्या सर्व बस प्रकारच्या तिकीट दरात सरसकट १० टक्के भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतलेला आहे. ही भाडेवाढ ७ नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपासून म्हणजे ८ नोव्हेंबर ते २७ नोव्हेंबरदरम्यान लागू राहणार आहे. त्यानंतर मूळ तिकीट दराप्रमाणे तिकीट आकारणी सुरू होईल. तसेच ज्या प्रवाशांनी आगाऊ तिकीट आरक्षण केले आहे, त्यांच्या तिकिटाची उर्वरित फरकाची रक्कम प्रत्यक्ष प्रवास करताना वाहकाकडे भरावी लागणार असल्याचे एसटी महामंडळाकडून सांगण्यात आले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम