नागालँडच्या ७ आमदारांनी दिला अजित पवारांना पाठींबा !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २० जुलै २०२३ । राज्यातील शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादीत मोठी बंडखोरी झाल्यानंतर पुन्हा एकदा अजित पवारांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का दिला आहे. अजित पवार यांना तीसहून अधिक आमदारांचा पाठिंबा असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यातच आता अजित पवार यांचं बळ वाढविणारे वृत्त आले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का मानला जात आहे.

नागालँडमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी अजित पवार यांच्या गटाला पाठिंबा दर्शविला आहे. पाठिंबा दर्शविणाऱ्यांमध्ये ७ आमदारांचा सामावेश आहे. नागालँड राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सांगण्यात आलं की, संपूर्ण प्रदेश कार्यकरणीने आणि जिल्हाध्यक्षांनी चर्चा केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार आणि कार्यकारी अध्यक्ष प्रफुल पटेल यांच्या नेतृत्वात नागालँडमध्ये पक्षाला मजबूत बनवायचं निश्चित केलं. नागालँड राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष वानथुंग ओडियो यांनी आज दिल्लीत कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल, महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे यांची भेट घेऊन अजित पवार गटाला आपला पाठिंबा दर्शवला. शिवाय सात आमदार आणि इतर पदाधिकाऱ्यांचा पाठिंबा असल्याचं शपथपत्र प्रफुल्ल पटेल यांच्याकडे सोपवले आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम